चेन्नई: तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीचा (Tamil Nadu Assembly Election 2021) धुरळा उडाला आहे. ६ एप्रिलपासून राज्यात मतदानाला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यांना विविध आश्वासनं देत आहेत. मात्र एका अपक्ष आमदाराच्या जाहीरनाम्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याला म्हणतात नशीब! फक्त १६३ रूपयांचं जेवण घेऊन ती घरी आली; अन् मिळाला १ कोटीचा मोतीदक्षिण मदुराई मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ३४ वर्षीय सरावनान यांनी मतदारांना अनेक आश्वासनं दिली आहेत. सरावनान यांनी दिलेली एकापेक्षा एक भन्नाट आश्वासनं पाहून मतदारदेखील 'उडाले' आहेत. निवडून आल्यास आयफोन, कार, हेलिकॉप्टर, रोबोट आणि बरंच काही देऊन अशी आश्वासनं त्यांनी दिली आहेत. त्यामुळे सरावनान यांचा जाहीरनामा सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.असाही आजार! आकर्षक पुरूष दिसला की लगेच डगमगते ही महिला, रस्त्याने खाली मान घालून चालणं भाग!मी निवडून आल्यास प्रत्येक घरामागे एक आयफोन, कार, हेलिकॉप्टर, रोबोट देईन. मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला स्विमिंग पूलसह तीन मजली घर, तरुणांना एक कोटी रुपये देईन. याशिवाय चंद्रांवर १०० दिवस सहलीला घेऊन जाईन, अशी आश्वासनं सरावनान यांनी दिली आहेत. मतदारांसोबतच मतदारसंघासाठीही त्यांनी मोठमोठी आश्वासनं दिली आहेत. मतदारसंघात अंतराळ संशोधन केंद्र, रॉकेट लॉन्चिंग साईट आणि ३०० फुटांचा कृत्रिम हिमनग उभारण्यात येईल, अशी घोषणादेखील सरावनान यांनी केली.
आयफोन, हेलिकॉप्टर, कार, रोबोट देणार; चंद्रावरही नेणार; अपक्ष उमेदवाराचा जाहीरनामा पाहून मतदार 'उडाले'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 3:40 PM