चेन्नई: आपलं लग्न अविस्मरणीय व्हावं, असं सगळ्यांनाच वाटतं. त्यामुळे लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तमिळनाडूत राहणाऱ्या व्ही. चिन्नादुराई आणि एस. श्वेता यांनादेखील असंच वाटायचं. त्यामुळेच त्यांनी लग्न करण्यासाठी एक भन्नाट प्लान केला. त्यांच्या या हटके लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या लग्नाचा व्हिडीओ अगदी भन्नाट आहे.चार वर्षांच्या चिमुरडीनं शोधला नामशेष झालेल्या डायनासोरच्या पायाचा ठसाचिन्नादुराई आणि श्वेता यांनी तमिळनाडूतल्या नीलकंरई येथील समुद्रात १ फेब्रुवारीला लग्न केलं. दोघेही अगदी व्यवस्थित तयार होऊन, नटूनथटून समुद्र किनारी आले होते. मुहूर्त जवळ येताच दोघांनी समुद्रात उडी घेतली. पाण्यात ६० फूट खाली गेले. दोघांनी एकमेकांना हार घातले. चिन्नादुराई आणि श्वेता पेशानं सॉफ्टवेअर इंजिनीयर आहेत. चिन्नादुरई प्रोफेशनल स्कूबा डायव्हर आहेत. तर श्वेता गेल्या काही महिन्यांपासून स्कूबा डायव्हिंग शिकत आहेत. लग्नाच्या वेळी दोघांनी पारंपारिक पोशाख परिधान केले होते.
VIDEO: या लग्नाचा न्याराच थाट; स्कूबा डायव्हिंग करत समुद्रात ६० फूट खोल बांधली लगीनगाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 12:29 PM