अनेकांना असा अनुभव आला असेल की, टॉयलेटला गेले असताना कमोडमध्ये काहीतरी पडलं. म्हणजे कधी चिल्लर पैसे तर कधी खिशातील काही वस्तू. मग काय होतं ते वेगवेगळं असू शकतं. तामिळनाडूच्या मदुराईमध्ये एक अशीच घटना घडली. इथे २९ वर्षीय तरूणी टॉयलेटला गेला आणि त्याची कारची चावी कमोडमध्ये पडली. तो ती चावी काढण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याचा हात असा काही फसला की तो जोरात ओरडू लागला.
या तरूणाचं नाव मणिमरन असून तो तंजावूरचा राहणारा आहे. जेव्हा तो टॉयलेटला गेला तेव्हा त्याची चावी कमोडमध्ये पडली. नंतर त्याने चावी काढण्यासाठी आत हात टाकला तर त्याचा हात फसला. साधारण दीड तास तो मदतीसाठी ओरडत राहिला. पण त्याच्या मदतीसाठी कुणी आलं नाही.
प्रवासादरम्यान तो एका पेट्रोल पंपावरील टॉयलेटमध्ये गेला होता. काही वेळाने जेव्हा पेट्रोल पंपावरील कर्मचारी टॉयलेटकडे आले तेव्हा त्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्यावेळी टॉयलेट आतून लॉक होतं आणि तो जोरात ओरडत होता.
यानंतर पोलीस आणि रेक्स्यू डिपार्टमेंटला या घटनेबाबत सांगण्यात आलं. त्यावेळी त्यांनी ड्रिल मशीनच्या माध्यमातून एक छिद्र केलं आणि तेव्हा त्याचा फसलेला हात बाहेर काढण्यात आला. सुदैवाने त्याच्या हाताला फ्रॅक्चर नाही. दरम्यान जेव्हा त्याचा हात अडकला होता तेव्हा त्याला पाइपमध्ये एक मोबाइलही सापडला. सोबतच त्याची चावीही मिळाली.