तामिळनाडू पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय राज्य आहे. राज्यात पाहण्यासारखी एकापेक्षा एक सुंदर ठिकाणे आहेत. इथला निसर्ग लोकांना भुरळ घालतो. पण, तामिळनाडून असेही एक ठिकाण आहे, जिथे संध्याकाळ जाण्यास लोक घाबरतात. इतकचं काय तर, सरकारनेही या ठिकाणी जाण्यास बंदी घातलेली आहे.
धनुषकोडी बनले 'घोस्ट टाऊन'
तामिळनाडूतील धनुषकोडी हे अतिशय प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. या ठिकाणी दिवसा पर्यटकांची खूप गर्दी पाहायला मिळते, पण रात्र होताच हा परिसर निर्जन होतो. या परिसरात संध्याकाळनंतर जाण्यास मनाई आहे. या ठिकाणाला राज्य सरकारनेच 'घोस्ट टाऊन'(भुतांचे शहर) म्हणून घोषित केले आहे.
श्री रामांचा धनुषकोडीशी संबंध
तामिळनाडूतील धनुषकोडी या ठिकाणाचा श्री रामाशी खास संबंध आहे. अशी अख्यायिका आहे की, भगवान श्री रामांनी लंका जिंकून परत येण्यापूर्वी रावणाचा भाऊ विभीषणला लंकेचा राजा बनवले. त्यावेळी विभीषणने रामाला लंकेत येणारा राम सेतू तोडण्याची विनंती केली. त्यानंतर भगवान रामाने बाण मारुन तो पूल तोडला. तेव्हापासून त्या स्थानाला धनुषकोडी म्हणून ओळखले जाऊ लागले.
धनुषकोडीला भूतांचे शहर का म्हणतात ?
धनुषकोडी हे शहर पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्र असले तरी, या ठिकाणी स्थानिक लोक राहायला घाबरतात. आजही ही जागा निर्जन आहे. असे म्हटले जाते की, 1964 मध्ये येथे एक तीव्र चक्रीवादळ आले होते. त्या वादळात हे पूर्ण गाव नष्ट झाले होते. तेव्हापासून या गावात कोणीच राहायला गेले नाही. या परिसरातील अनेकजण म्हणतात की, रात्र होताच या ठिकाणी विचित्र आवाज ऐकू येतात. अनेकांनी या ठिकाणी भूत दिसल्याचा दावाही केला आहे. एखादी दुर्दैवी घटना घडू नये, म्हणून सरकारने या ठिकाणी रात्री येण्यास बंदी घातलेली आहे.