माणसं आणि मुक्या जनावरांचे नातं हे अनोखे आहे. या नात्यातून खूप काही शिकायला मिळतं. लहान लहान काड्या, कचरा आपल्या चोचीत मावेल आणि जे मिळेल ते साहित्य घेऊन पक्षी आपलं सुंदर असं घरटं तयार करतात. झाडांवर घरटं बांधण्याव्यतिरिक्त एखाद्या घराच्या खिडकीजवळ, कोपरा गाठून पक्षी आपलं घरटं बांधतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक गमतीदार किस्सा सांगणार आहोत.
एका पक्ष्याने रस्त्यावरील लाईट्सच्या स्वीचबोर्डच्या आत आपलं घरटं तयार केलं त्यानंतर अंडी सुद्धा दिली आहेत. गावातील लोकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रस्त्यावरील लाईट लावणंच सोडून दिलं. तुमचा विश्वास बसणार नाही पण जवळपास ३५ दिवस या गावातील लोकांनी रस्त्यावरील लाईट्स बंद ठेवले होते. ही घटना परदेशात नाही तर भारतातच घडली आहे.
तामिळनाडूमधील शिवगंगा भागात एक गाव आहे. या गावकऱ्यांना काही दिवसांपूर्वी कळले की रस्त्यावरील लाईट्सच्या स्वीचबोर्डच्या आत पक्ष्याने एक घरटं तयार केलं होतं. या घरट्यात ३ निळ्या आणि हिरव्या रंगाची अंडी होती. गावातील काही सदस्यांनी मिळून या पक्ष्याच्य घरट्याचा फोटो गावातील इतर लोकांना व्हाट्सअॅपच्या माध्यमातून पाठवला. त्यावेळी गावातील सगळया लोकांनी मिळून ठरवलं की जोपर्यंत पक्षी घरट्यातून सुखरूप बाहेर येणार नाहीत. तोपर्यंत स्वीचबोर्डचा वापर केला जाणार नाही. त्यामुळेच ३५ दिवस या गावातील रस्त्यावरील लाईट्स बंद ठेवाव्या लागल्या.
त्यानंतर पंचायत अध्यक्ष एच कालीश्वरी सुद्धा यात सहभागी झाल्या. दरम्यान गावातील काही लोकांनी या गोष्टीसाठी विरोधही केला. त्यानंतर गावतील इतर लोकांनी समजावल्यानंतर सगळेजण लाईट्स बंद ठेवण्यासाठी तयार झाले. गावात बैठक घेण्यात आली त्यातून लाईट्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्ष्याची अंडी आणि घरटी वाचवण्यासाठी संपूर्ण गाव तब्बल ३५ दिवस अंधारात राहिल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण
भय इथले संपत नाही! देशात कोरोनापेक्षाही घातक आजाराचा शिरकाव; 'या' शहरात आढळला रुग्ण