आजकाल लोक वास्तविक जगापेक्षा जास्त सोशल मीडियावर राहतात. सोशल मीडियावर लोक त्यांच्या पर्सनल लाइफबाबत गोष्टी शेअर करतात. पण अनेकदा असं करणं महागातही पडू शकतं. असंच काहीसं एका महिला शिक्षिकेसोबत झालं आहे. या महिला शिक्षिकेला तिची नोकरी गमवावी लागली आहे.
'डेली मेल'च्या वृत्तानुसार, यूकेतील २५ एला ग्रिफ्फिथ एका शाळेत शिक्षिका होती. तिने बॉयफ्रेन्डसोबत फिरायला जाण्यासाठी शाळेच्या प्रिन्सिपलला खोटं सांगून एक आठवड्याची सुट्टी घेतली होती. नंतर बॉयफ्रेन्डसोबत फिरायला गेली. पण तिच्या बॉयफ्रेन्डने असं काही केलं की, तिचा भांडाफोड झाला. तिच्या बॉयफ्रेन्ड फेसबुकवर दोघांचे फोटो शेअर केले त्यानंतर सर्वांना हे माहीत पडलं.
एला ग्रिफ्फिथ जेव्हा आपल्या बॉयफ्रेन्डसोबत फिरायला गेली तेव्हा पूर्ण काळजी घेत तिने या ट्रिपबाबत फेसबुकवर काहीच शेअर केलं नव्हतं. पण तिच्या बॉयफ्रेन्डने ट्रिपचे सगळे फोटो फेसबुकवर शेअर करत एलाला टॅग केलं. यामुळे महिला शिक्षिकेचं खोटं समोर आलं. यानंतर प्रिन्सिपलने एलाला नोकरीहून काढलं. एलाने घरात सीरीअस समस्या असल्याचं कारण सांगत सुट्टी मागितली होती.
एलाने प्रिन्सिपलला सांगितलं होतं की, स्वत:ला सांभाळण्यासाठी तिला एका आठवड्याची सुट्टी हवीये. यानंतर प्रिन्सिपलने तिची अडचण समजून तिला सुट्टी दिली. प्रिन्सिपलला माहीत नव्हतं की, एला तिच्या बॉयफ्रेन्डसोबत फिरायला जात आहे. एला वेल्सच्या Ysgol Cybi school मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी करत होती. ती तिच्या बॉयफ्रेन्डसोबत रोमला सुट्टीवर गेली होती.