NFT म्हणजेच Non-Fungible Token मुळे एक 22 वर्षांचा मुलगा कोट्यधीश झाला आहे. इंडोनेशियाचा सुलतान गुस्ताफ अल घोझालिक याने NFT म्हणून आपला सेल्फी विकला आहे. NFT ही एक डिजिटल मालमत्ता आहे, जी रियल-वर्ल्ड आयटम्सच्या ओनरशिपला रिप्रझेंट करते. सुलतान गुस्ताफ अल घोझालिक हा संगणक शास्त्राचा विद्यार्थी आहे. फ्रान्स 24 च्या रिपोर्टनुसार, तो पाच वर्षांपर्यंत रोज कॉम्प्युटरवर आपला फोटो काढत असे. काही लोक त्यांचे सेल्फी टी-शर्टवर छापत आहेत आणि गाण्यांतही वापरत आहेत.
गुस्ताफने या सेल्फींचा वापर आपल्या ग्रॅज्युएशनसाठी एक टाइम-लॅप्स व्हिडिओ तयार करण्यासाठी केला आणि नंतर तो NFT च्या स्वरुपात विकण्याचा निर्णय घेतला. त्याने 933 सेल्फी Ghozali Everyday नावाने ट्रेडिंग प्लॅटफॉर्म OpeanSea वर लिस्ट करण्याचा निर्णय घेतला. कुणी आपले सेल्फी विकत घेईल, अशी आशा आपल्याला नव्हती. यामुळेच आपण ते केवळ 3 डॉलरलाच लिस्ट केले होते, असे Ghozali ने सांगितले. माध्यमांतील वृत्तांनुसार, Ghozali चे फोटो एका सेलिब्रिटी शेफने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिस्ट केले होते. यानंतर त्याला जबरदस्त पॉपुलॅरिटी मिळाली.
यानंतर 500 युजर्सनी Ghozali चा हा फोटो विकत घेतला आहे. त्याचे कलेक्शन 384 Ether एवढे झाले आहे. खरे तर यासंदर्भात Ghozali कंफ्यूज आहे. त्याने ट्विट करत लिहिले आहे, 'आज 230 हून अधिक फोटो विकले गेले आहेत आणि आपण हे का खरेदी करत आहात हे मला समजू शकलेले नाही. पण, आपण माझ्या पाच वर्षांच्या प्रयत्नांसाठी जे काही दिले आहे, त्यासाठी मी तुमचे आभार मानतो.
त्याने पुढे लिहिले आहे, कृपया माझ्या फोटोसोबत कुठल्याही प्रकारचे असभ्य वर्तन करू नका. अन्यथा माझ्या कुटुंबीयांना फार दुःख होईल... माझा आपल्यावर विश्वास आहे, यामुळे माझ्या फोटोंवर लक्ष असू द्या. France24 च्या वृत्तानुसार, या पैशांतून एक अॅनिमेशन स्टूडिओ विकत घेण्याची Ghozali ची इच्छा आहे.