(image Credit- The Conversation)
जगभरातील बरेचसे लोक खाण्यापिण्याचे खूप शौकिन असतात. त्यांना आपले आवडते खाद्यपदार्थ ठराविक वेळेला हवेत असतात. जर ते योग्यवेळी मिळाले नाही तर काहीही करण्यासाची त्यांची तयार असते. आज आम्ही तुम्हाला असाच काहीसा प्रकार सांगणार आहोत. तायवानमध्ये अशी चमत्कारिक घटना घडली आहे. १८ वर्षांचा तरूण गेल्या अनेक दिवसांपासून कोमात होता. अचानक त्याने आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचे नाव ऐकले आणि शुद्धीवर आला.
या तरूणाला डॉक्टरांनी आणि नातेवाईकांनी अनेकदा प्रयत्न करूनही कोमातून बाहेर आणण्यात यश आलं नव्हतं. या तरूणाचे नाव चीयू आहे. डॉक्टरांसह नातेवाईकांनी चीयू बरा होण्याची आशा सोडून दिली होती. पण अचानक चमत्कार झाल आणि चीयू कोमातून बाहेर आला.
दुचाकी अपघातामुळे हा प्रसंग ओढावला
तायवानी माध्यमांनी दिलेल्या रिपोर्ट्सनुसार उत्तरी-पश्चिमी तायवानचा रहिवासी असलेला हा तरूण जुलैमध्ये एका दुचाकी अपघातात गंभीर स्वरुपात जखमी झाला. त्यामुळे त्याची स्मरणशक्तीसुद्धा कमी झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं. डॉक्टरांना चीयूला वाचवण्यात यश आलं पण अनेक महिन्यांपासून चीयू कोमात होता. चीयूच्या मोठ्या भावाने त्याच्याशी मस्करी केल्यानंतर तब्बल ६२ दिवसांनी हा तरूण कोमातून बाहेर आला.
क्या बोनस है रे बाबा! बोनसची वाट पाहण्याच्या नादात नेटकऱ्यांनी पाडला भन्नाट मीम्सचा पाऊस; पाहा फोटो
रुग्णालयात भेटण्यासाठी आलेल्या चीयूच्या मोठ्या भावाने त्याला सांगितले की, तुझ्या आवडीचे चिकन फिलेट घेऊन आलो आहे. आपल्या आवडच्या खाद्यपदार्थाचं नाव ऐकून चीयू शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर लगेचच रुग्णालयातील डॉक्टरांनी चीयूची तपासणी केली. काही दिवसांनी एक केक कापून त्याला घरच्यासह निरोप दिला. हृदयद्रावक! ....म्हणून मोठ्या संख्येने प्राण्यांना गमवावं लागलं घर; समोर आले भीषण फोटो