नवी दिल्ली - तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यात दगडांमध्ये अडकलेल्या युवकाला रेस्क्यू करण्यात आले आहे. घनपूर जंगलात मोबाईल फोन काढण्याच्या प्रयत्नात एक युवक गुंफेत अडकला. युवकाला वाचवण्यात यश आले आहे. तो तेंलगणातील रेड्डीपेट गावात राहणारा राजू नावाचा हा युवक आहे अशी माहिती तेलंगणातील पोलिसांनी दिली.
कामारेड्डी जिल्ह्यात १३ डिसेंबर मंगळवारी संध्याकाळी मोबाईल काढण्याच्या प्रयत्नात युवक दोन मोठ्या खडकांमधील गुहेत अडकला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ डिसेंबरला पोलिसांना याची माहिती मिळाली. जिल्ह्याचे एसएसपी श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले की, आम्हाला याची माहिती मिळताच दगड फोडण्यासाठी तात्काळ जेसीबी घटनास्थळी पाठवण्यात आला. १५ डिसेंबर रोजी दुपारी २.३० च्या सुमारास दगड फोडण्यात आल्याने युवक बचावला. गुहेतून बाहेर काढल्यानंतर त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले.
राजू गुहेत पडलेला मोबाईल शोधण्यासाठी आत गेला होता असं पीडिताच्या मित्राने सांगितले. ही घटना १३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली, मात्र १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. स्थानिक गावकऱ्यांनी कळवलं. राजू मित्रासोबत घनपूर जंगलात शिकारीला गेला असता मोबाईल गुहेत पडला. तो काढण्याचा प्रयत्न करत असताना युवक खाली घसरला. त्याच्या कुटुंबीयांनी अडकलेल्या अवस्थेत त्याला पाणी आणि काही तयार जेवण खायला दिले होते असं पोलिसांनी सांगितले.