चर्चा तर होणारच! ३०० रुपयाचं तिकीट अन् १२ कोटींची लॉटरी; मंदिराचा क्लर्क बनला रातोरात कोट्यधीश
By प्रविण मरगळे | Published: September 23, 2020 04:19 PM2020-09-23T16:19:29+5:302020-09-23T16:20:35+5:30
अनंतूच्या आई-वडिलांव्यतिरिक्त त्याच्या कुटुंबात दोन भावंडे आहेत. लॉकडाऊनमुळे सामान्य मध्यमवर्गीय विजयन कुटुंबीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
कोचीच्या २४ वर्षीय अनंतू विजयनला १२ कोटींची लॉटरी लागली आहे. एका मंदिरात क्लर्क म्हणून काम करणाऱ्या तरुणाचं नशिब चमकलं आहे. ३०० रुपयांचे ओनम बंपर लॉटरीचं त्याने तिकीट खरेदी केले होते. यापूर्वी त्याला लॉटरीत ५ हजार रुपये लागले होते. म्हणून त्याने दुसऱ्यांदा नशीब आजमवून पाहण्याचं ठरवलं.
यानंतर अनंतूने ३०० रुपयांचे लॉटरीचं तिकीट घेतलं. त्याच्या नशिबानं पुन्हा त्याला साथ दिली आणि चक्क १२ कोटींची रक्कम त्याला बक्षिस म्हणून लागली. जिंकलेल्या रक्कमेतून कर वजा करुन अनंतूला सुमारे साडेसात कोटी रुपये मिळतील. वास्तविक, अनंतूच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तो जितकं कमवतो त्यातच कुटुंब चालवतो. त्याचे वडील पेंटर आहेत, बहीण फर्ममध्ये अकाऊंटंट होती, परंतु लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. सध्या वडिलांचे कामही बंद पडलं आहे.
याबाबत अनंतू म्हणाला की, केरळ सरकारने रविवारी संध्याकाळी ओनम बंपर लॉटरी २०२० चा निकाल जाहीर केला तेव्हा मी स्तब्ध झालो, माझ्या नावाने १२ कोटींची लॉटरी लागली होती. केरळच्या इडुक्की येथे जन्मलेल्या अनंतू विजयन काही क्षणातच कोट्यधीश झाला. कारण त्याला १२ कोटींची लॉटरी लागली. त्यातून कर आणि इतर शुल्क वजा करुन त्याला ७.५० कोटी रुपये मिळणार आहेत. अनंतूव्यतिरिक्त ६ जणांना द्वितीय बक्षिस मिळालं आहे. त्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये मिळतील.
जीर्ण झालेले घर दुरुस्त करण्यासाठी सरकारची मदत
अनंतूच्या आई-वडिलांव्यतिरिक्त त्याच्या कुटुंबात दोन भावंडे आहेत. लॉकडाऊनमुळे सामान्य मध्यमवर्गीय विजयन कुटुंबीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ५ दशकं जुन्या घराची अवस्था आता बिकट झाली आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी सरकारने मदत मागितली आहे, परंतु अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही.
या पैशांचे काय करावे हे ठरलेले नाही
अनंतूने म्हटले आहे की, या पैशातून आपण काय करणार याविषयी त्याने काहीच निर्णय घेतलेला नाही. सुरक्षेच्या उद्देशाने त्याने लॉटरीचे तिकिट बँकेत ठेवले आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
देव तारी त्याला कोण मारी! खेळता खेळता २ वर्षाच्या बहिणीला भावाने रेल्वेसमोर फेकले, तितक्यात...
“महाराष्ट्र अस्मिता अन् मराठी माणसासाठी लढलो म्हणून तुरुंगात टाकणार असाल तर माझी तयारी"
भाजपाचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?; खासदार शरद पवारांची महत्त्वाची बैठक सुरु
...पण तरीही ते 'घरी'च, दार उघड भावा दार उघड! विरोधकांचा उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला
खडसेंचा विचार म्हणजे अंबुजा सिमेंटची दिवार, दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही; भाजपा नेत्याचा दावा