इजिप्तमध्ये सुरू असलेल्या उत्खननात दररोज काहीना काही नवीन समोर येतं. अनेक ममीच्या कबरीतून अनेक खुलासे झाले आहेत. अशात हा फोटो तुम्ही पाहिला तर तुम्हाला वाटेल की, चिखलातील काही मगरी हळूहळू आपल्या शिकारीकडे जात आहेत. पण मुळात या मगरीच्या ममी आहेत. इजिप्तमध्ये वाहणारी नील नदीच्या पश्चिममेला एका मकबऱ्यात 10 मगरींच्या ममी आढळून आल्या आहेत. या मकबऱ्याचं नाव आहे कूब्बत अल-हवा. असं सांगितलं जातं की, मगरींच्या या ममी साधारण 2500 वर्ष जुन्या आहेत.
प्राचीन इजिप्तमध्ये प्रजननाची देवता सोबेकला खूश करण्यासाठी लोक मगरी देत होते. कारण इजिप्तमधील पौराणिक कथांनुसार, सोबेक एक अशी देवता होते, ज्यांचं शीर मगरीचं होतं आणि शरीर मनुष्यांचं होतं. ज्या ममी सापडल्या त्या 10 वयस्क मगरींच्या आहेत. असं मानलं जातं की, या मगरी दोन वेगवेगळ्या प्रजातींच्या असू शकतात. याबाबत नुकताच एक रिपोर्ट प्रकाशित झाला.
इजिप्तच्या संस्कृतीमध्ये मगरींना फार महत्वाचं स्थान आहे. इथे मगरींना देवाच्या रूपात पाहिलं जातं. सोबतच इथे त्यांना खाल्लंही जातं. त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचा वेगवेगळा वापर होतो. जसे की, मगरीच्या चरबीपासून औषध तयार केलं जातं. इजिप्तमध्ये याआधी इबिसेस, मांजरी आणि माकडांच्या ममी सापडल्या आहेत.
याआधीही मगरीच्या ममी सापडल्या आहेत. पण त्या छोट्या मगरींच्या होत्या. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने वयस्क मगरींच्या ममी शोधण्यात आल्या. रॉयल बेल्जियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅच्युरल सायन्सेसच्या आर्कियोजुओलॉजिस्ट डॉ. बी दे कुपेरे यांनी सांगितलं की, सामान्यपणे आम्हाला तुकड्यांमध्ये वस्तू सापडतात. पहिल्यांदाच एका मकबऱ्यात 10 मगरींच्या ममी सापडल्या. हे खास आहे.
कुपेरे यांनी सांगितलं की, मला स्पेनच्या अलेजांद्रो जिमेनेज सेरानो यांनी फोन केला. ते म्हणाले की, तुम्ही कूब्बत अल-हवा यायला हवं. तिथे पोहोचले तर मगरींच्या ममी बघून हैराण झाले. याआधी 2018 मध्ये मगरींच्या ममी सापडल्या होत्या. पण त्या मगरी फार लहान होत्या.
डॉ. कुपेरे यांनी सांगितलं की, जेव्हा प्राचीन जीव आढळतात तेव्हा त्या काळातील बरीच माहिती मिळते. ज्या दहा ममी सापडल्या. त्यांच्यातील केवळ पाचचे डोक्याचे भाग वाचले आहेत. एक तर सात फूट लांब आहे आणि त्याच्या शरीराचं सगळा भाग व्यवस्थित आहे. या मगरींना लेनिन कपड्यांमध्ये गुंडाळलं होतं. आता अभ्यासक त्यांच्यावर अभ्यास करत आहेत.