नशेत गाडी चालवू नये यासाठी कितीही ओरड केली तरीही काहीजण मात्र नियमांचे पालन करत नाहीत. नशेमध्ये गाडी चालवल्यामुळे सर्वप्रथम धोका असतो तो तुमच्याच जीवाला. असं असतानाही अनेकजण नशेत गाडी चालवतात आणि स्वत: सोबत इतरांचेही नुकसान करतात. त्यामुळे झालेल्या अपघातात त्यांचाही जीव जातो अन् दुसरेही आपला जीव गमवतात. नॉर्वेमध्येही एक युवक रस्त्यावर नशेत गाडी चालवता चालवता झोपला अन्...
नॉर्वेमध्ये एक २४ वर्षाचा मुलगा नशेमध्ये टेस्ला कार चालवत होता. अचानक त्याला झोप लागली. मात्र दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. गाडी चालवत असताना अचानक गाडी चालवण्याचे थांबल्यामुळे ती टेस्ला गाडी ऑटोपायलट मोडवर गेली अन् आपोआप चालू लागली. पुढे ती गाडी काहीवेळाने थांबली आणि हजार्ड लाईट्स चालू झाले. यामुळे रस्त्यावरून गाडी चालवणाऱ्या इतर चालकांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे आणि त्यांनी गाडी थांबवून त्या मुलाल वाचवलं.
हा व्हिडिओ ज्यांनी पाहिला ते टेस्लाच्या या ऑटोमेटिक कारचे कौतूक करत आहेत तर काहीजण नशेत गाडी चालवणाऱ्या त्या मुलावर कमेंट्सद्वारे राग काढत आहेत. त्या मुलाच्या नशीबाने ती गाडी वेळीच थांबली अन्यथा मोठा अपघात घडण्याची शक्यता होती.