Tesla ची सेल्फ ड्राईव्ह कार अॅडव्हान्स्ड टेक्नॉलिजीचं उत्तम उदाहरण आहे. परंतु या टेक्नॉलॉजीमध्ये अद्यापही सुधारणांची आवश्यकता आहे. सध्या टेस्लाच्या सेल्फ ड्राईव्ह कारबाबक एक असा किस्सा घडला ज्यामुळे या कारच्या ऑटो पायलट सिस्टमला अपडेटची आवश्यकता असल्याचं मानलं जात आहे. काही दिवसांपूर्वी एक घटना घडली, ज्यामध्ये आकाशात दिसणारा चंद्र टेस्लाची कार ट्रॅफिक लाईट समजून आपला स्पीड सतत कमी करत होती.
जॉर्डन नेल्सन या कार चालकाला टेस्लाच्या ऑटो ड्राईव्ह कारचा अनोखा अनुभव आला. काही दिवसांपूर्वी ते आपल्या कारनं एका ठिकाणी जात होते. यादरम्यान, त्यांनी पाहिलं की आपल्या कारचा स्पीड सातत्यानं कमी जास्त होत आहे. नेल्सन यांनी ही समस्या काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यावेळी त्याचं उत्तर मिळालं नाही. परंतु काही वेळानं त्यांना हा संपूर्ण प्रकार लक्षात आला.