थायलॅंडचे एक अरबपती उद्योगपती हे आरनॉन रोदथोंग हे त्यांच्या मुलीचं लग्न करत आहेत. त्यासाठी ते मुलाच्या शोधात आहेत. तुम्ही म्हणाल यात काय वेगळं? सगळेच वडील हे त्यांच्या मुलीसाठी मुलं शोधतात. पण इथे पुढे ट्विस्ट आहे. मजेदार बाब म्हणजे त्यांनी लग्नासाठी मुलगा शोधण्यासाठी चक्क एका दुर्नामेंटचं आयोजन केलं आहे. ही टुर्नामेंट जिंकणाऱ्या मुलाशी ते मुलीचं लग्न लावून देतील. इतकंच नाही तर जिंकणाऱ्या मुलाला बक्षिस म्हणून २ कोटी २१ लाख रूपये सुद्धा मिळणार आहेत. मग काय विचार आहे तुमचा?
उद्योगपती आरनॉन रोदथोंग यांची मुलगी २६ वर्षांची असून तिचं नाव Karnsita Rodthong असं आहे. या मुलीच्या तीन अटी आहेत. त्याच आधारावर ते त्यांच्या मुलीचं लग्न लावून देणार आहेत. ज्या मुलाने ही टुर्मानेंट जिंकली त्याला जवळपास २.२३ कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहे. त्यासोबतच अरबो रूपयांचा व्यवसायही मिळेल, असेही बोलले जात आहे.
या आहेत अटी
आरनॉन यांनी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. त्यात त्यांनी अटीही सांगितल्या. त्यातील पहिली अट आहे की, मुलगा सुंदर असो वा नसो पण सुशिक्षित नक्कीच असावा. त्याला चायनीज आणि इंग्रजी वाचता आणि बोलता यायला हवी.
दुसरी अट अशी आहे की, त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न आळशी मुलाशी करून द्यायचं नाहीये. मुलगा मेहनती असायला हवा.
आरनॉन हे डूरियन फळाचे व्यापारी आहेत. डूरियन हे फार जास्त दुर्गंधी येणारं फळ आहे. आरनॉन यांना असं वाटतं की, त्यांच्या मुलीशी लग्न करणाऱ्या मुलाला डूरियन फळाबाबत पूर्ण माहिती असावी.
टूर्नामेंटमध्ये काय होणार?
जावई शोधण्यासाठी आरनॉन एका टुर्नामेंटचं आयोजन करणार आहेत. यासाठी अनेक मुलांनी अर्जही केला आहे. यात मुलांच्या माहितीची तपासणी केली जाईल. मुलांना डूरियन व्यवसायाची किती माहिती आहे हे सुद्धा तपासलं जाणार आहे. ही टुर्नामेंट १ एप्रिल रोजी थायलॅंडमधील पटायामध्ये होणार आहे. आता असाही प्रश्न पडू शकतो की, हे लोक एप्रिल फूल तर करणार नाही ना?