आजकाल लोक नोकरी करण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका देशातून दुसऱ्या देशातही जातात. अशात घरापासून दूर राहत असताना त्यांना अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. यात पुरूष आणि महिला दोघांनाही या समस्या होतात. थायलॅंमध्ये एका तरूणीसोबत असंच काहीसं झालं. ती परदेशात जाऊन एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. पण एक दिवस ती अचानक गायब झाली. कुणाला तिच्याबाबत काही माहीत नव्हतं. अचानक एक वर्षाने तिच्याबाबत अशी माहिती समोर आली ज्याचा कुणी विचारही केला नसेल.
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 31 वर्षीय कायकन केनाकम थायलॅंडची राहणारी होती आणि बहरीनमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती. इथेच ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटली होती. रेस्टॉरंटमध्ये काम करून ती घरीही काही पैसे पाठवत होती. मॉडलिंगची आवड असल्याने ती सोशल मीडियावर फार अॅक्टिव राहत होती. ती सोशल मीडियावर तिचे फोटो-व्हिडीओ शेअर करत होती. पण अचानक एप्रिल 2023 मध्ये तिच्या परिवाराला आणि सोशल मीडिया फॅन्सना तिच्याबाबत अपडेट मिळणं बंद झालं.
परिवार चिंतेत होता त्यांना बहरीनमधील थायलॅंड एम्बसीला फोन केला. पण त्यानीही ठोस असं काही सांगितलं नाही. 12 महिन्यांपासून ती गायब होती. पण काही दिवसांआधी 18 एप्रिलला बहरीन येथील थाय एम्बसीने परिवाराला सांगितलं की, महिलेची पत्ता लागला आहे. पण ती आता जिवंत नाही. तिचा मृतदेह गेल्या 1 वर्षापासून एका हॉस्पिटलच्या स्टोरमध्ये ठेवला आहे.
सलमानिया मेडिकल कॉम्प्लेक्सने परिवाराला साऊथ एशिअन महिलेचा चेहरा-मोहरा सांगितला आणि सोबतच हेही सांगितलं की, तिच्या एका पायावर टॅटू आहे. तेव्हा परिवाराला समजलं की, ही त्यांचीच मुलगी आहे. महिलेच्या मृत्यूचं कारण विषारी दारू प्यायल्याने फुप्फुसं आणि हृदय बंद होणं आहे. आता परिवार तिचा मृतदेह देशात परत आणण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांना संशय आहे की, मुलीला विष देऊ मारलं गेलं असेल. तरूणीची बहीण म्हणाली की, तिची बहीण 2 ते 3 वर्षापासून बहरीनमध्ये काम करत होती. तिला एक अरब बॉयफ्रेंड भेटला होता. गेल्या एप्रिलपासूनच हे लोक त्याच्यासोबत संपर्क करू शकत नाहीयेत.