प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर दिसावं, इतरांपेक्षा वेगळं दिसावं असं वाटतं. आजच्या काळात शरीराचा कोणताही भाग चांगला आणि सुंदर करण्यासाठी शस्त्रक्रिया करता येते, पण त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. थायलंडच्या मॉडेलला देखील खूप सुंदर दिसायचं होतं परंतु त्यासाठी तिने स्वस्त पर्याय निवडला. यानंतर मॉडेलची झालेली भयंकर अवस्था पाहून तुम्हालाही मोठा धक्का बसेल.
द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, थायलंडची 26 वर्षीय मॉडेल माली कंजनाफुपिंग (Mali Kanjanaphuping) इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि 1.5 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात. अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये त्याने आपल्या चेहऱ्याची स्थिती सर्वांना सांगितली आहे. प्रत्येकजण तिला पाहून हैराण झालं आहे कारण तिचा सुंदर चेहरा पूर्णपणे खराब दिसत आहे.
मालीला तिचा चेहरा आवडत नव्हता. तिचे गाल जाड होते, त्यामुळे जेव्हा ती हसायची तेव्हा तिला स्वतःमध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवायची. त्यामुळेच गालावर शस्त्रक्रिया करून ते बारीक करावे, असा विचार तिने केला. क्लिनिकमध्ये शस्त्रक्रिया करणारी महिला डॉक्टर नव्हती, ती फक्त एक नर्स होती. मालीवर अनेक शस्त्रक्रिया झाल्या होत्या, त्यामुळे तिला चांगली सूटही मिळाली. फिलर इंजेक्शनसाठी क्लिनिकमध्ये 8,000 रुपये आकारले जात होते, परंतु मालीकडून केवळ 6,000 रुपये घेतले जात होते. स्वस्तात होत असल्याचं पाहून तिने गालात इंजेक्शन घेतले.
काही वेळाने तिच्या चेहऱ्यावर जळजळ सुरू झाली आणि चेहरा लाल झाला. तिला वाटलं की हे नॉर्मल साईडइफेक्ट आहेत आणि दुसऱ्या दिवशी सर्व काही ठीक होईल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिचा चेहरा पाहून तिला धक्काच बसला. चेहऱ्यावर खोलवर पुरळ उठले होते आणि पू बाहेर येत होता. यासोबतच फोडही आले. एक-दोन दिवस तिने चेहऱ्याची स्थिती जशीच्या तशी सोडली कारण तिला वाटले की कदाचित स्वतःहून बरी होईल, पण तिसऱ्या दिवशी जेव्हा चेहऱ्याची स्थिती बिघडू लागली तेव्हा ती दुसऱ्या त्वचारोग तज्ज्ञाकडे गेली.
मालीच्या गालावर इंजेक्शन देण्यात आलेले फिलर निकृष्ट दर्जाचे असल्याने चेहऱ्यावरील रक्तवाहिन्या बंद झाल्या असल्याचे डॉक्टरांना तपासात निष्पन्न झाले. फिलर चुकून तिच्या डोळ्यांपर्यंत पोहोचला असता तर तिला खूप त्रास झाला असता. मालीला आता डॉक्टरांनी अनेक प्रकारची औषधे दिली असून, तिची प्रकृती सुधारत आहे. पण तरीही तिच्या चेहऱ्यावर एक डाग आहे जो दूर होत नाही. ती आता लोकांना सावध करत आहे की थोडे पैसे वाचवण्यासाठी स्वस्त शस्त्रक्रियेचा पर्याय निवडू नका आणि विश्वसनीय ठिकाणी जाऊन शस्त्रक्रिया करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"