pistachios : पिस्ता तर तुम्ही अनेकदा खाल्ला असेल. पण जगातल्या सर्वात चांगल्या पिस्त्याचं उत्पादन कुठे घेतलं जातं हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना! चला मग जाणून घेऊ सर्वात चांगल्या पिस्त्याचं आणि महागड्या पिस्त्याचं उत्पादन कुठे घेतलं जातं. इटलीच्या एटना पर्वताजवळ ब्रोटे हा परिसर आपल्या सुंदरतेसाठी ओळखला जातो. पण या ठिकाणाची खासियत फार कमी लोकांना माहीत आहे.
सिसली द्वीपाच्या कुशीत वसलेल्या ब्रोटेमध्ये जगातला सर्वात चांगला आणि सर्वात महाग पिस्त्याचं उत्पादन घेतलं जातं. त्यामुळे इथे पिस्त्याची चोरी होण्याची सतत भीती असते. अशात पिस्ता सुरक्षेसाठी राष्ट्रीय पोलीस दलातील जवानांना इथे तैनात करण्यात आलं आहे. ग्रीन गोल्ड नावाने प्रसिद्ध
कॅप्टन निकोलो मोरांडीसोबत ५ ऑफिसर इथे सुरक्षेसाठी तैनात असतात. हे लोक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सकाळापासून ते रात्रीपर्यंत पिस्त्याची रखवाली करतात. कॅप्टन मोरांडी यांच्यानुसार, जर गरज पडली तर हेलिकॉप्टरनेही लक्ष ठेवलं जाईल. ते असेही म्हणाले की, पिस्ता सुरक्षेसाठी वेगवेगळ्या सुरक्षा व्यवस्था ठेवल्या जातील.
मोरोंडी यांच्यानुसार, पिस्त्याचं पिक सप्टेंबरपर्यंत तयार होईल. त्यामुळे ऑपरेशन आताच सुरू करणं लोकांना विचित्र वाटत आहे. पण टीमला यासाठी तयार करणे गरजेचं होतं. कारण ज्या लोकांची या बागांवर नजर आहे, ते आतापासूनच सक्रिय झाले आहेत.
स्थानिक व्यापार संघटनेचे प्रमुख सिम्बली यांच्यानुसार, या परिसरात २३० अधिकृत शेतकरी आहेत, हेच लोक पिस्त्याची लागवड, तोडणी आणि बाहेर पाठवण्याचं काम बघतात. या पिस्त्याचा रंग आणि चव फार चांगली असल्याने तोडणीवेळीच याची चोरी होण्याची शक्यता अधिक असते. सिसलीमध्ये उत्पादन होत असल्याने हा पिस्ता सिसलीमध्ये ग्रीन गोल्ड म्हणूण ओळखला जातो. या एक किलो पिस्ताची किंमत साधारण ४ हजार रूपये इतकी आहे. तर अमेरिका आणि इराणच्या पिस्त्याला २ हजार ते २५०० रूपये प्रति किलो भाव मिळतो.
या पिस्त्याला इतकी किंमत असण्याचं कारण म्हणजे या पिस्त्याचं वरचं आवरण काढल्यावरही याचा हिरवेपणा पुढेही बराच काळ टिकून राहतो. जर बाकीच्या पिस्त्यांचं रंग हलका होतो.