शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

लाच मागितल्यावर नर्सने मुंडन करून दिले केस, नंतर झाला तुफान राडा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 7:48 PM

परदेशात नव्हे तर भारतातील राज्यात घडला हा धक्कादायक प्रकार

Bribe Case, Hairs: कधी कधी अशा काही घटना घडतात की ज्या कल्पनेच्या पलिकडे असतात. त्याची पुनरावृत्ती तुम्हालाही आवडत नाही. शाजापूर येथे एक विचित्र प्रकरण पहायला मिळाले, जिथे एका महिला परिचारिकेने तिच्या सामान्य भविष्य निर्वाह निधीसाठी (GPF) पैशासाठी जिल्हा मुख्यालयाच्या आरोग्य विभागात अर्ज केला. परंतु चार महिने उलटूनही कोणतीही प्रगती दिसून आली नाही. यानंतर आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याला या व्यवहाराबाबत सांगितले असता त्याने लाच मागितली. यावर संतप्त नर्सने मुंडण करून थेट त्यांना लाचेत केस दिले. त्यानंतर या प्रकरणाने भलताच राडा झाला.

व्यवहाराच्या कारणावरून महिलेने केस कापले

कर्मचार्‍यांच्या मासिक पगाराचा एक भाग भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मध्ये जतन केला जातो, जो निवृत्तीनंतर घेतला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्यप्रदेशच्या एएनएम कृष्णा विश्वकर्मा यांनी 4 महिन्यांपूर्वी शाजापूरच्या जिल्हा मुख्यालयात त्यांचे पीएफचे पैसे काढण्यासाठी अर्ज केला होता. आरोग्य विभागावर आरोप करत परिचारिकेने सांगितले की, सिव्हिल सर्जनमध्ये उपस्थित अधिकारी म्हणाले की, 'तुम्ही आमच्या चहापाण्याचं बघा, मी आणि सर तुमचे पैसे 4 दिवसात मिळवून देतो.' त्यानंतर कृष्णाने प्रत्युत्तरात सिव्हिल सर्जनच्या नावाने मुंडण करून आपले केस अधिकाऱ्याला लाच म्हणून दिले.

पुढे काय घडलं?

वारंवार पाठपुरावा करत घेऊनही पैसे न मिळाल्याने वैतागून महिलेने हे पाऊल उचलले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिव्हिल सर्जन बीएस मीना यांनी माहिती दिली की, नर्स कृष्णाने जीपीएफसाठी अर्ज केला. खाते जुळत नसल्यास शिल्लक दाखवत नाही. कोषागार विभागाला पत्र लिहिले आहे. एक-दोन दिवसांत नर्सचे खाते आणि हिशेब जुळला तर शिल्लक दिसेल आणि पैसे ट्रान्सफर होतील असे सांगण्यात आले. लाचेच्या व्यवहाराचे प्रकरण उघडकीस आल्यावर हे काम झपाट्याने झाले, अन्यथा चार महिन्यात हे काम होऊ शकले नव्हते. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणJara hatkeजरा हटके