विभाष झा पाटणा : चहा-पाण्यासाठी बस एखाद्या ठिकाणी थांबवल्याचे आपण नेहमीच पाहतो आणि अनुभवतोसुद्धा; पण बिहारच्या सिवानमध्ये रेल्वेच्या एका चालकाने चहासाठी रेल्वे थांबवल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.
१११२३ डाऊन ग्वाल्हेर मेल एक्स्प्रेसच्या चालकाने सिसवन क्रॉसिंगवर रेल्वे उभी केली. रेल्वे थांबताच रेल्वेचा सहायक चालक क्रॉसिंगजवळील दुकानाकडे गेला व हातात चहाचा कप घेऊन पुन्हा इंजिनमध्ये चढला. या कालावधीत क्रॉसिंगवर रेल्वे थांबली. यानंतर चहाचा आस्वाद घेताच पायलट ट्रेन मार्गस्थ झाली. हा संपूर्ण प्रकार पाहणारे लोक अवाक् झाले. क्रॉसिंगवर दुचाकी घेऊन उभा असलेला रोहित याने सांगितले की, असा प्रकार मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. त्याच्या प्रमाणेच ज्याने कुणी हा प्रकार ऐकला, तो आश्चर्यचकित झाला. या संपूर्ण प्रकाराबाबतची चौकशी करण्याची मागणी स्टेशन अधीक्षक अनंत कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.