सोशल मीडियावर वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणारी एक महिला पुन्हा केंद्रस्थानी आलीय. या मुलीने तिच्या डेटिंग लाईफबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. काही वर्षापूर्वी ही महिला एका आठवड्यात ६ वेळा डेटवर गेली होती त्यानंतर तिला २ वर्ष घरातील सामान विकत घेण्याची गरज भासली नाही. या काळात मी खऱ्या प्रेमाच्या शोधात होती असं या मुलीने स्पष्ट केले.
व्यवसायानं ट्रेडर विवियन टू टिकटॉकवर @yourrichbff यूजरनेमनं पॉप्युलर आहे. तिचे टिकटॉकवर २३ लाखाहून अधिक फोलोअर्स आहेत. विवियनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओ ती सांगते की, एका आठवड्यात मी ६ वेळा डेटवर गेली होती. २०१६-२०१८ दरम्यान ही घटना आहे. मी ६ वेळा डेटवर गेले त्यानंतर पुढील २ वर्ष मला घरातील कुठलीच वस्तू खरेदी करण्याची गरज वाटली नाही.
आता विवियनने Elite Daily सह अलीकडच्या मुलाखतीत या व्हायरल व्हिडिओवर अनेक गोष्टी शेअर केल्यात. हा व्हिडिओ मज्जामस्करीच्या उद्देशाने बनवला होता. विवियन म्हणाली की, डेटवर ती केवळ खाण्यासाठी गेली नव्हती. डेटिंगमुळे मला आर्थिक स्वरुपात खूप मदत झाली. डेटिंगवर गेल्यानंतर ती ४ हजार ते ८ हजार रुपये वाचवायची. त्यामुळे तिने प्राडा कंपनीची काळी बॅग खरेदी केली. जेव्हा विवियन न्यूयॉर्क सिटीत राहायला आली तेव्हा तिने डेटिंग्स App वापरण्यास सुरुवात केली.
विवियननं म्हटलं की, ती वर्षाला जवळपास ८० लाख कमावत होती. तिचा खर्च खूप जास्त होता. फ्रीमध्ये जेवण करण्यासाठी डेटिंगवर जाणं चांगली कल्पना नाही. मी त्यावेळी डेटवर खऱ्या प्रेमाच्या शोधात होती. डेटिंगवर जाऊन पैसे वाचवण्याचे प्रकार अनेक टिकटॉक युजर्सने अंमलात आणली. काही यूजर्सने विवियनला स्मार्ट म्हटलं. तर एकाने तुझ्याकडे खूप जास्त पैसे आहेत त्यामुळे डेटिंगवर जाण्याची गरज नाही असंही सांगितले.