The golden Buddha : जगातल्या अनेक देशांमध्ये भगवान बुद्ध यांच्या मूर्ती आहेत आणि काही तर इतक्या जुन्या आहेत की, त्या कधी बनवल्या गेल्या हेही कुणाला माहीत नाही. तशी तर जगातील सगळ्यात मोठी बुद्ध मूर्ती चीनच्या दक्षिण-पश्चिम सिचुआन प्रांतात आहे. जी बनवण्यासाठी 90 पेक्षा जास्त वर्ष लागले हते. दगडाची ही भव्य मूर्ती बनवण्याची सुरूवात तांग वंशा (618-907) च्या शासनकाळात झाली होती. पण तुम्हाला माहीत आहे का की, जगातील सगळ्यात मोठी सोन्याची मूर्ती कुठे आहे? ही मूर्ती भगवान बुद्ध यांची आहे, ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल.
भगवान बुद्धांच्या या मूर्तीला 'द गोल्डन बुद्धा' म्हटलं जातं. ही मूर्ती थायलॅंडची राजधानी बॅंकॉकच्या 'वाट ट्रेमिट' मंदिरात आहे. 9.8 फूट लांब या मूर्तीचं वजन साधारण 5500 किलो आहे. ही प्रतिमा विकण्यासाठी नाही. पण तरीही सोन्याच्या हिशेबाने याच्या किंमतीचा अंदाज 19 अब्ज रूपये इतका लावण्यात आला होता.
ही मूर्ती अनेकवर्ष जगाच्या नजरेपासून दूर होती. ही शोधली जाण्याची कहाणीही फार रोचक आहे. 1954 पर्यंत लोकांना या मूर्तीबाबत माहीत नव्हतं की, ही मूर्ती पूर्णपणे सोन्यापासून बनली आहे. कारण या मूर्तीवर प्लास्टर लावण्यात आलं होतं. ही मूर्ती ठेवण्यासाठी मंदिरात एक मोठं भवन बनवण्यात आलं आणि जेव्हा 1955 मध्ये या मूर्तीचं स्थानांतरण होत होतं तेव्हा मूर्ती खाली पडली आणि त्याचं प्लास्टर निघालं. तेव्हा सत्य लोकांसमोर आलं.
असं म्हणतात की, सोन्याच्या या मूर्तीवर प्लास्टर लावण्यात आलं होतं जेणेकरून ही मूर्ती चोरांपासून वाचवली जावी. असं मानलं जातं की, 1767 मध्ये बर्मातील हल्ल्यानंतर अयुथ्या राज्याच्या विनाशाआधी मूर्तीवर प्लास्टर करण्याचं काम झालं असेल.
तशी तर ही मूर्ती कधी बनवली हे कुणालाही माहीत नाही. पण ही 13व्या-14व्या शतकात सुखोथाई राजवंश शैलीत बनली आहे. त्यामुळे असं मानलं जातं की, ही त्याच काळात बनवली असेल किंवा त्यानंतर बनवली असेल. मूर्तीचं डोकं अंड्याच्या आकाराचं आहे.