उदयपूरच्या एका व्यक्तीने आपली कार वारंवार खराब होत असल्याने आणि खरेदी केल्यानंतर, सपोर्टिव्ह स्टाफला कंटाळून मोठा निर्णय घेतला आहे. या व्यक्तीने ढोल-ताशा वाजवत आपली कार गाढवांच्या सहाय्याने शोरूमपर्यंत पोहोचवली. 17.50 लाख रुपयांची ही ह्यूंदाई क्रेटामध्ये वारंवार बिघाड होत असल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.
गाढवाच्या सहाय्याने शोरूमपर्यंत नेली कार - सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक गाढव महागडी कार रस्त्यावरून ओढताना दिसत आहे. एवढेच नाही, तर या वेळी कार मालकाने ढोल ताशा वाल्यांनाही बोलावले होते. याशिवाय आणखी काही लोकही या कारला मागून ढकलत होते. यावेळी बरेच लोक कार सोबतही चालत होते.
एका युजरने हा व्हिडिओ शेअर करताना, "भारतीयांसोबत कधीच पंगा घ्यायचा नाही. उदयपूर येथे 18 लाख रुपयांची गाडी खरा झाली. यानंतर कार मालकाने ती गाढवाच्या सहाय्याने शोरूममध्ये पोहोचवली. महत्वाचे म्हणजे, या कार मालकाने शोरूमवर फोन केला होता. मात्र तेथून कसल्याही प्रकारची मदत न मिळाल्याने संबंधित व्यक्तीने आपली कार ओढवाच्या सहाय्याने ओडली," असे म्हटले आहे.
कार शोरूमवर नेण्याचा निर्णय -उदयपूरमधील सुंदरवास भागातील राज कुमार गायरी यांनी दावा केला आहे की, त्यांचे काका शंकरलाल यांनी शहरातील माद्री इंडस्ट्रियल भागातील एका स्टोरमधून 17.50 लाख रुपयांची एक नवी कार खरेदी केली होती. ऑथराइज्ड सर्व्हिस सेंटरला कारमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक समस्यांसंदर्भात माहिती देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून मदत न मिळाल्याने काका निराश झाले होते. कार दोन वेळा सर्व्हिस सेंटरवर आणण्यात आली. मात्र डिल योग्य उपाय सांगू शकला नाही. राज कुमार यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान कार सुरू करण्यासाठी त्यांना प्रचंड धक्का द्यावा लागला होता.
यासंदर्भात सर्व्हिस सेंटरसोबत संपर्क साधला असता, तेथील एका कर्मचाऱ्याने ही समस्या बॅटर डिस्चार्ज झाल्याने आली असावी, बॅटरी चार्ज करण्यासाठी काही अंतरापर्यंत गाडी चालवा असे सांगितले. मात्र सर्व प्रयत्न करूनही समस्या न सुटल्याने, आम्ही कार डिलरशिपवर परत आणण्याचा निर्णय घेतला. तसेच गाडी बदलण्याचीही मागणी केली आहे.