सोशल मीडियावर एक ऑनलाइन व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये झूम कॉलवर कर्मचाऱ्यांचं भांडण होताना दिसत आहे. हे कर्मचारी स्क्रिप्टेड भांडणाचं नाटक करत आहेत. ही व्हिडीओ क्लिप एक्सवर ‘घर के कलेश’ नावाच्या पेजवर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये काही कर्मचारी हे झूम कॉलवरून नव्या वर्षाचा प्लॅन बनवत होते. मात्र या व्यक्तीने हिंदीत बोलण्यास सुरुवात केली. त्याने हिंदीमध्ये बोलण्यास सुरुवात करताच सहकर्मचाऱ्यांमध्ये भाषेवरून वादाला सुरुवात झाली.
या छोट्याश्या व्हिडीओमध्ये एका कर्मचाऱ्याने इतरांना इंग्रजीत बोलण्याचा आग्रह केला. कारण त्याला हिंदी समजत नव्हती. तो थोडा इंग्रजीत बोलला. मात्र नंतर पुन्हा हिंदीत बोलू लागला. त्यामुळे इतर सहकारी संतापले आणि भांडणाला तोंड फुटले. एका कर्मचाऱ्याने मध्येत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि हिंदी बोलणाऱ्याना मी समजावेन असं सांगितले. तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने एवढ्याशा गोष्टीवरून भांडू नका, असा सल्ला दिला. पण संतापलेल्या कर्मचाऱ्याने कुणाचंच काही ऐकलं नाही. तसेच सर्वजण आपापल्या भाषेत बोलू लागले.
हा व्हिडीओ प्रथमदर्शनी स्क्रिप्टेड वाटत आहे. मात्र काही दिवसांमध्येच हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. तसेच आता को घर के कलेश नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.