सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. तसेच मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आईसक्रिम येण्यास सुरुवात झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आईसक्रिम खायला आवडतं. आईसक्रिमची किंमतही वेगवेगळी असते. आईसक्रिमची किंमत ही वेगवेगळी असते. काही आईसक्रिम हे ५ रुपयांना मिळतात. तर काहींची किंमत ही ५०० रुपयांपर्यंत असते. प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे आईसक्रिम खातो. मात्र जगात एक असंही आईसक्रीम आहे, जे केवळ अतिश्रीमंत लोकच खरेदी करू शकतात. कारण ते एवढं महाग आहे की, ते खरेदी करण्यासाठी गरीबांना कर्ज घ्यावं लागेल. या आईसक्रिमची किंमत एवढी आहे की त्याच्या किमतीत एखादी चांगली कार खरेदी करता येऊ शकेल.
गेल्या २५ एप्रिल रोजी एका आईसक्रिमने जगातील सर्वात महागडे आईसक्रिम असल्याचा विक्रम नोंदवला आहे. जपानमधील आईसक्रिम निर्माता कंपनी सिलाटो हिने ब्याकुया नावाचं हे आईसक्रिम लाँच केलं आहे. हे प्रोटिनयुक्त आईसक्रिम जगातील सर्वात महागडं आईसक्रिम बनलं आहे. या आईसक्रिमचा वेलवेटी बेस दुधापासून बनवलेला असको. तसेच त्यात दोन प्रकारचे चीज, अंड्याच्या पिवळ्या भागाचाही समावेश असतो. त्याशिवाय पॅर्मियानो चीज, व्हाइट ट्रुफल ऑईल आदी वस्तूंचाही समावेश असतो. हे आईसक्रिम स्टायलिश ब्लॅकबॉक्समध्ये उपलब्ध असते. त्यासोबत हाताने बनवलेला एक धातूचा चमचासुद्धा दिला जातो. हा चमचा क्टोटो येथील काही क्राफ्टमन बनवतात.
या खास वैशिष्ट्ये असलेल्या आइसक्रिमची किंमतही तेवढीच जास्त आहे. कंपनीच्या वेबसाईटवर १३० मिली ब्याकुया आईसक्रिमची किंमत ही ६७०० डॉलर म्हणजेच ५ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. आधी या आईसक्रिमसोबत मिळणारा चमचा महाग असल्याने आईसक्रिमची किंमत अधिक असावी अशा अंदाज वर्तवला जात होता. मात्र तसं नाही आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने चमच्याची किंमत न मोजताच या आईसक्रिमची किंमत सांगितली आहे. हे आईसक्रिम व्हाईट वाईनसोबत खाण्यामध्ये अधिक स्वादिष्ट लागते, असा दावाही कंपनीने केला आहे.