काही लोक असे असतात जे खूप मोठे असूनही लोकांच्या नजरेपासून दूर राहतात. त्यांना सतत चर्चेत राहणं किंवा शो ऑफ करणं आवडत नाही. ब्रिटनमधील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेला हा उद्योगपतीही असाच आहे. त्यांची एकूण संपत्ती 14.88 ट्रिलियन रूपये आहे. पण ते इतके लपून राहतात की, त्यांच्या लंडनच्या मुख्य ऑफिसमधील रिसेप्शनिस्टनेही त्याच्याबाबत काही ऐकलं नाही.
फायनान्स विश्वास सगळ्यात जास्त कमाई करणारी व्यक्ती असूनही मायकल प्लॅट आपल्या प्रायव्हसीची खूप काळजी घेतात. त्यानी आणि ब्लूक्रेस्टचा सह-संस्थापक विलियम रीव्सने 2006 मध्ये कंपनी सुरू केली होती. तेव्हा टाइम्सने त्यांच्यावर एक लेख छापला होता. तेव्हा त्यांनी फोटो काढण्यास स्पष्ट मनाई केली होती.
क्रेस्ट कॅपिटल मॅनेजमेंटसोबत मायकल प्लॅटच्या यशाने त्यांना जेम्स डायसन, आईएनईओएसचे मालक आणि मॅनचेस्टर यूनाइटेडचे प्रमुख शेअरधारक सर जिम रॅटक्लिफ आणि इतर काही मोठ्या नावांना मागे टाकून ब्रिटनचा सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनवलं.
डेली मेलच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, अजूनही बऱ्याच लोकांनी त्यांच्याबाबत ऐकलं नाही. ज्यात त्याच्या काही कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. अवाक् करणारी बाब म्हणजे व्हिक्टोरियाच्या उंच इमारतीत असलेल्या कंपनीच्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्टने देखील त्यांच्याबाबत कधी काही ऐकलं नाही.बिझनेस एडिटर पॅट्रिक होस्किंगने लिहिलं की, "ते आपल्या गोपनियतेची आणि प्रायव्हसीची खूप काळजी घेतात. त्याना सतत मीडियात चर्चेत राहणं आवडत नाही".
हेज फंड मार्केट विजार्ड्स: हाउ विनिंग ट्रेडर्स विन म्हणाले की, प्लॅट 1930 च्या दशकात लंकाशायरच्या प्रेस्टनच्या एका भागातील एका जुन्या घरात राहणाऱ्या मजूर परिवारातील आहेत.
त्यांचे वडील मॅनचेस्टर विश्वविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरचे प्रोफेसर होते. एका स्टोरीनुसार ते 12 वर्षाचे असताना आपल्या आजीला भेटायचा जात होते. तिने त्यांना शेअरचा व्यापार करणं शिकवलं होतं. त्यांनी आपल्या वाढदिवसाला 50 हजार रूपयांची गुंतवणूक केली ज्याची किंमत वाढून तीन पट झाली. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून गणित आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. तेव्हापासून ते गुंतवणूक करत होते.