शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

तब्बल १८ महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर सापडला दगड, किंमत ऐकुन धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 4:27 PM

वेल्समधल्या एका व्यक्तीसोबतही असंच घडलं, जेव्हा त्याला आकाशातून एक चमकणारा दगड कोसळताना दिसला. हा दगड शोधण्यासाठी त्याने जवळपास एक वर्ष घालवलं. मात्र जेव्हा हा दगड त्याला सापडला, तेव्हा त्याची किंमत ऐकून हा व्यक्ती थक्क झाला.

जगात अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्यांच्याबद्दल आपण कल्पनाही केलेली नसते (Weird Things About World). त्यामुळे अशा काही गोष्टी समोर आल्या की आपल्याला ते अतिशय विशेष वाटतं. अजूनही आपल्याला या जगातील सगळ्याच गोष्टी माहिती आहेत असं नाही. दररोज जगातील अनेक नवनवीन गोष्टी आपल्यासमोर येत असतात. वेल्समधल्या एका व्यक्तीसोबतही असंच घडलं, जेव्हा त्याला आकाशातून एक चमकणारा दगड कोसळताना दिसला. हा दगड शोधण्यासाठी त्याने जवळपास एक वर्ष घालवलं. मात्र जेव्हा हा दगड त्याला सापडला, तेव्हा त्याची किंमत ऐकून हा व्यक्ती थक्क झाला (Price of Wales Meteorite).

द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, नॉर्थ वेल्सच्या व्रॅक्सहॅममध्ये राहणाऱ्या ३८ वर्षाचा टोनी व्हिल्डिंग (Tony Whilding) आपल्या घराच्या अंगणात सिगरेट पित होता. इतक्यात अचानक त्याला आकाशात काहीतरी उडणारी वस्तू दिसली. त्याने सांगितलं की आकाशात अगदी तीव्र प्रकाश दिसला.

त्याला दिसलं की आगीने वेढलेला एक दगड जमिनीच्या दिशेने येत आहे. हा दगड जमिनीच्या अगदी जवळ येत होता आणि त्याच्या आजूबाजूला भरपूर धूरही होता. त्याने सांगितलं की जसजसा हा दगड त्याच्या घराच्या दिशेने येत होता, तसा तो आणखीच जास्त चमकत होता. मात्र अचानक हा दगड गायब झाला आणि वरती फक्त धूर दिसू लागला. टोनीला याचा अंदाज आला होता, की हे एर उल्कापिंड आहे. त्यामुळे तो तेव्हापासूनच याचा शोध घेत होता.

टोनीने आसपासच्या शेतांमध्ये हा दगड शोधण्यास सुरुवात केली आणि जवळपास १८ महिन्यानंतर त्याला तो दगड एका शेतात आढळला. नॉर्थ वेल्स लाईव्ह वेबसाईटच्या वृत्तानुसार, हा दगड सापडल्यानंतर त्याने त्याच्यावर रिसर्च केला आणि अनेक जाणकारांचा सल्ला मागितला. सर्वांनी हेच सांगितलं की हा दगड उल्कापिंड वाटत आहे. हा दगड जरा खरंच उल्कापिंड निघाला तर त्याची किंमत १ कोटीहूनही अधिक असणार आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके