शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
3
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
4
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
5
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
6
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
7
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
8
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
9
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
10
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
11
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
13
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
14
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
16
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
17
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
18
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
19
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
20
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!

डिवोर्स पार्टी देण्यासाठी गेली होती महिला, टॉपलेस वेटर आवडला अन् केलं त्याच्यासोबत दुसरं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 2:17 PM

Weird love story: एका महिलेने घटस्फोट झाल्यानंतर एका रेस्टॉरन्टमध्ये डिवोर्स पार्टीचं आयोजन केलं आणि त्याच पार्टीत तिला नवा जीवनसाथी मिळाला. या महिलेने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या या लव्हस्टोरीबाबत सांगितलं.

Weird love story:  असं म्हणतात की, जोड्या देवाच्या घरी तयार होत असतात. कुणाचं लग्न कुणासोबत होणार किंवा अखेरपर्यंत कोण साथ देणार हे आधीच लिहिलेलं असतं. हेही तुम्ही एकलं असेल की, प्रेमात सगळं काही माफ असतं. दररोज वेगवेगळ्या अजब लव्हस्टोरी आपल्याला ऐकायला मिळतात. अशीच एक अजब लव्हस्टोरी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका महिलेने घटस्फोट झाल्यानंतर एका रेस्टॉरन्टमध्ये डिवोर्स पार्टीचं आयोजन केलं आणि त्याच पार्टीत तिला नवा जीवनसाथी मिळाला. या महिलेने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या या लव्हस्टोरीबाबत सांगितलं.

पार्टीत बोलवले होते टॉपलेस वेटर्स

या महिलेचं नाव आहे गॅब्रिएला लॅंडोल्फी (Gabriella Landolfi). तिच्या दहा वर्ष चाललेल्या रिलेशनशिपचा शेवट जून 2017 ला झाला. त्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये तिचा घटस्फोट झाला. तेव्हा तिने तिच्या खास मित्रांसाठी डिवोर्स पार्टीचं आयोजन केलं होतं.  आपल्या या खास पार्टीमध्ये गॅब्रिएलाने टॉपलेस वेटर बोलवले होते. गॅब्रिएला या वेटरपैकी एकाच्या प्रेमात पडली. दोघांना महिनाभर एकमेकांना डेट केलं. त्यानंतर लग्न केलं. या लग्नातून त्यांना एक बाळही झालं. 29 वर्षी गॅब्रिएला ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये राहते. ती ह्यूमॅनिटीजची टीचर आहे. ती काही वर्षाआधी जॉन लॅंडोल्फी नावाच्या वेटरच्या प्रेमात पडली होती. त्यांची लव्हस्टोरी आता सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

'वेल्स ऑनलाइन' मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, 29 वर्षीय गॅब्रिएलाचा 10 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर डिवोर्स झाला होता. यानंतर तीन वर्षांनी तिने डिवोर्स पार्टीचं आयोजन केलं होतं. जिथे तिने मैत्रिणींसोबत मस्ती करण्यासाठी काही खास व्यवस्था केली होती. गॅब्रिएला म्हणाली की, मी या पार्टीमध्ये टॉपलेस वेटर्स बोलवले होते. तिथे वेटर म्हणून आलेला जॉन लॅंडोल्फी मला खूप आवडला. त्याने मला एक मेसेज केला आणि मी दुसऱ्या दिवशी मी त्याला भेटायला गेले. पहिल्याच भेटीत तो त्याच्या लूक्स आणि बॉडीने शो-ऑफ करत होता. मला ते आवडलं.

या भेटीनंतर लॅंडोल्फी जॉनच्या मित्रांना भेटली, जेणेकरून जॉनची माहिती मिळावी आणि हे समजावं की, खरंच तो तिच्यावर प्रेम करतो की नाही. यानंतर 2019 मध्ये जॉनने गॅब्रिएलाला प्रपोज केलं. नोव्हेंबर 2020 मध्ये दोघांनी लग्न केलं आणि जुलै 2021 मध्ये त्यांना एक बाळ झालं. ज्याचं नाव मेटो आहे. गॅब्रिएलाने मीडियासोबत बोलताना सांगितलं की, तिने कधी विचारही नव्हता केला की, तिची लव्हस्टोरी अशाप्रकारे लोकांना आवडेल आणि सोशल मीडियावर व्हायरल होईल.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJara hatkeजरा हटके