वॉशिंग्टन : मुलींना काळे, दाट आणि लांब केस आवडतात. मात्र, केसावरील प्रेमामुळे एक महिला हेअर क्वीन बनली आहे. या आहेत अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे राहणाऱ्या आशा मंडेला. त्यांचे केस ५५ फूट लांब असून, त्यांचे वजन तब्बल २० किलो आहे. जगातील सर्वात लांब केसांची महिला म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. आशा यांना केस धुण्यासाठी एका वेळेला शाम्पूच्या सहा बाटल्या लागतात. तसेच केस धुतल्यानंतर ते सुकण्यास दोन दिवसांचा अवधी लागतो. एवढे लांब केस असल्यामुळे गेल्या २५ वर्षांत त्यांनी केस विंचरलेच नाहीत. बाल्कनीत उभ्या राहून केस सुकवत असताना त्यांचे केस जमिनीवर रुळतात. केसामुळे मान आणि पाठदुखी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही केस कापा, असा सल्ला डॉक्टरांनी त्यांना अनेकदा दिला. मात्र, आशा केस कापण्यास तयार झाल्या नाहीत. आता त्यांचे केसच त्यांच्या कमाईचे साधन बनले आहेत. त्या केश उत्पादने अणि अॅसेसरीजच्या जाहिराती करतात. त्यातून त्यांना वार्षिक लाखो डॉलरची कमाई होत आहे. लांब केसामुळे त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. मात्र, लग्न जुळण्यात अडचणी आल्या. प्रचंड लांब केसांमुळे कोणीही त्यांच्याशी विवाहास तयार होत नव्हते आणि आशा केस कापण्यास राजी नव्हत्या. ही कोंडी अखेर हेअर ड्रेसर इमानुएल शेग यांनी फोडली. त्यांना आशा पसंत पडल्या आणि दोघांचा थाटात विवाह झाला.
२५ वर्षांपासून केसांना कंगवा नाही
By admin | Published: May 05, 2017 1:15 AM