बीजिंग : ही घटना आहे चीनमधील. एक महिला शॉपिंग करण्यासाठी एका दुकानात गेली. बहुतांश महिला कोणतीही वस्तू पारखून घेतात; पण असे करणे या महिलेला खूपच महाग पडले. झाले काय की, एक महागडे ब्रेसलेट या महिलेच्या हातून खाली पडले आणि फुटले. या ब्रेसलेटची किंमत ऐकून तर या महिलेला चक्करच आली. त्यानंतर या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, आता तिची प्रकृती स्थिर आहे. तब्बल २८ लाख रुपयांच्या या ब्रेसलेटची किंमत वसूल करण्यासाठी चीनच्या युनान प्रांतातील ज्वेलरी शॉप आता प्रयत्न करीत आहे.
शॉपिंग करताना ब्रेसलेट फुटले, किंमत ऐकून चक्कर आली
By admin | Published: July 04, 2017 1:00 AM