Country Without Snake: भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साप, पाली, विंचू दिसणं सामान्य बाब आहे. सापांना बघून तर लोक खूप घाबरतात. अनेकदा विषारी सापाने दंश मारला म्हणून व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्याही बातम्या येत असतात. भारतात जगभरात सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. यातील काही विषारी तर काही बिन विषारी असतात. मात्र, जगात अशीही काही ठिकाणं आहेत जिथे साप किंवा पाल दिसत नाही.
आर्कटिक सर्कल आणि अंटार्कटिकामध्ये साप आणि पाली नसतात. याचं कारण म्हणजे या भागांमध्ये सतत बर्फ गोठलेला असतो. साप इतकी थंडी सहन करू शकत नाही. त्याशिवाय आयरलॅंड, न्यूझीलॅंड, आइसलॅंड आणि ग्रीनलॅंडमध्ये साप आढळत नाहीत.
या देशांमध्ये साप न दिसण्याची वेगवेगळी कारणं आहेत. काही लोक याला धार्मिक कारणं मानतात तर काही वैज्ञानिक. आयरलॅंडमध्ये मान्यता आहे की, पूर्वी या देशात भरपूर साप होते. सगळीकडे सापच साप दिसत होते. सापांमुळे लोकांना खूप समस्या होत होत्या. तेव्हा संत पॅट्रिक लोकांच्या मागणीनंतर 40 दिवस उपाशी राहिले होते. त्यानंतर त्यांनी सगळे साप समुद्रात पाठवले. हेच कारण आहे की, आयरलॅंडमध्ये दरवर्षी एक उत्सव साजरा केला जातो, ज्यात सापांची पूजा केली जाते.
तेच वैज्ञानिकांचं मत आहे की, बऱ्याच वर्षाआधी देशात केवळ बर्फच होता. इतक्या थंड वातावरणात सापाचं राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे इथे सापांची कोणतीही प्रजाती दिसत नाही. वैज्ञानिक सांगतात की, सापांचं रक्त गरम असतं आणि ते थंड भागात राहू शकत नाहीत. न्यूझीलॅंड, आइसलॅंड आणि ग्रीनलॅंड या देशांमध्ये नेहमीच थंड वातावरण असतं.