Moon Star Shoes: सामान्य लोक शूज घालून बाहेर जातात. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे शूज वापरले जातात. ज्यांची किंमत हजारो रूपये असते. पण जगातील सगळ्यात महाग शूज कोणता आहे हे तुम्हाला माहीत आहे का? कदाचित माहीत नसेल. आज आम्ही तुम्हाला जगातल्या सगळ्यात महाग शूजबाबत सांगणार आहोत.
वेगवेगळ्या निमित्तांसाठी वेगवेगळे शूज असतात. खेळण्यासाठी वेगळा, लग्नासाठी वेगळा किंवा एखाद्या इव्हेंटसाठी वेगळा शूज लोक घालतात. क्वालिटी आणि मटेरिअलनुसार शूजची किंमत ठरत असते. पण जगातील सगळ्यात महागडा शूज कोणते हे तुम्हाला माहीत नसेल.
जगातील सगळ्यात महागडा शूड मून स्टार आहे. ज्याची किंमत 1.63 अब्ज डॉलर आहे. हा जगातील सगळ्यात महागडा शूज आहे. भारतीय करन्सीनुसार ही किंमत 141 कोटी रूपये होते.
हा शूज शुद्ध सोन्यापासून बनवण्यात आला आहे. याला तयार करण्यासाठी 30 कॅरेटचे हिरे वापरण्यात आले आहेत. तर सोबतच 1576 मधील एक उल्कापिंडाचाही यात वापर करण्यात आला आहे.
हा शूज पहिल्यांदा 2017 मध्ये तयार करण्यात आला होता. हा शूज इटलीतील डिझायनर एंटोनियो विएट्रीने तयार केला आहे. शूजची डिलिव्हरी हेलिकॉप्टरने करण्यात आली होती.