Worlds Smallest Car: आजकाल टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की, ऑटोमोबाईल क्षेत्रातही वेगवेगळे प्रयोग होत राहतात. रोज नवनव्या वेगळ्या डिझाइनच्या कार लॉन्च होत असतात. बऱ्याच लोकांना आलिशान गाड्यांची आवड असते. शहरांमध्ये गाड्यांची इतकी संख्या वाढली आहे की, आता लोक मोठ्यांऐवजी छोट्या कार घेणं पसंत करतात. पण तुम्हाला जगातील सगळ्यात छोटी कार कोणती आहे आणि तिची किती किंमत आहे माहीत आहे का? कदाचित माहीत नसेल. पण आज आम्ही त्याबाबत माहिती देणार आहोत.
जगातील सगळ्यात छोटी कार
जगातील सगळ्यात छोटी कार कोणती तर ती आहे Peel P50. भारतात आपण सगळ्यात छोटी कार ही टाटाची नॅनो पाहिली आहे. पण ही कार नॅनोपेक्षाही लहान आहे. सामान्यपणे कारला चार चाके असतात. पण Peel P50 ला चार चाके नाहीत. ही एक थ्री सीटर कार आहे. या कारची लांबी134 सेंटी मीटर आहे. महत्वाची बाब म्हणजे या कारमध्ये केवळ एक व्यक्ती बसू शकते. ही कार पहिल्यांदा १९६२ मध्ये तयार करण्यात आली होती. पील नावाच्या ऑटोमोबाइल कंपनीने ही कार बनवली होती. तर ही कार एलेक्स ऑर्चिन नावाच्या डिझायनरने डिझाइन केली होती.
Peel P50 कारच्या डायमेंशनबाबत सांगायचं तर या कारची रूंदी ९८ सेंटी मीटर आहे. तेच या कारची उंची १०० सेंटी मीटर आहे. कारच्या वजनाबाबत सांगायचं तर ही एकाद्या बाइकच्या वजनापेक्षाही कमी आहे. या कारचं वजन ५९ किलोची आहे. २०१० मध्ये या कारला जगातील सगळ्यात छोटी कार म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं.
किती आहे किंमत
ही कार शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी चालवण्यासाठी बनवण्यात आलं होतं. जर कुणाला एकट्यासाठी कार खरेदी करायची अशेल तर ते PEEL P50 कार घेऊ शकतात. पण या कारची किंमत वाचून तुम्हाला धक्का बसेल. कुणालाही वाटेल की, इतकी लहान कार स्वस्तात मिळेल. पण असं नाहीये या कारची किंमत ८४ लाख रूपये इतकी आहे.