एक महिला स्वतःला 'जगातील सर्वात कंजूस करोडपती' म्हणत आहे. तिचा खर्च कमी ठेवण्यासाठी ती कधीच नवीन काही खरेदी करत नाही. तर कधी मांजरीचे अन्न खात असल्याचे ती सांगते. तिच्याकडे तब्बल 40 कोटींहून अधिक संपत्ती आहे. तिने आपल्या महिन्याचे बजेट निश्चित केले आहे. या बजेटबाहेर ती एक रुपयाही खर्च करत नाही.
एमी एलिझाबेथ (Aimee Elizabeth) असं या 51 वर्षीय करोडपती महिलेचं नाव आहे. ती अमेरिकेतील लास वेगासची रहिवासी आहे. तिची एकूण संपत्ती 43 कोटींहून अधिक आहे. पण एमी तिचे पैसे खर्च करण्याबाबत खूप कडक आहे. एमी म्हणते की तिने स्वतःसाठी 80,000 रुपये महिन्याचं बजेट निश्चित केले आहे. तिला तिच्या मासिक बजेटपेक्षा जास्त खर्च करणे आवडत नाही. पैसे वाचवण्यासाठी तिने अनेक युक्त्या शोधल्या आहेत.
उदाहरणार्थ, ती आपलं वॉटर हीटर एक मिनिटही जास्त चालू ठेवत नाही. घरातील इतर विद्युत उपकरणांबाबतही असेच होते. यामुळे त्यांची दर महिन्याला मोठी बचत होते. एका टीव्ही शोमध्ये, एमीने पैसे वाचवण्याचा सर्वात विचित्र मार्ग सांगितला. ती म्हणाली- कधी कधी ती कॅट फूड पण खाते. एमीने स्वतः कबूल केले की तिने तिच्या पाहुण्यांनाही मांजरीचे अन्न दिले आहे.
डब्याऐवजी सुट्ट सामान विकत घेते जेणेकरून ते स्वस्त होईल. एमी म्हणते की, लोकांना हे विचित्र वाटेल पण मला त्याची पर्वा नाही, कारण त्यामुळे पैसे वाचतात. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एमी एक यशस्वी रिअल इस्टेट गुंतवणूकदार, लेखक आणि व्यवसाय सल्लागार आहे. टीएलसीच्या रिएलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. यामध्ये त्यांनी तिच्या आयुष्याशी संबंधित सर्व पैलू उलगडले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"