Marriage Weird Tradition : समाजाने आज फार प्रगती केली आहे. मग ते टेक्नॉलॉजीबाबत असो वा लाइफस्टाईलबाबत असो. लोक आता आधीपेक्षा खूप बदलले आहेत. पण आजही काही समाजाचे लोक हा नवा बदल स्वीकारण्यास तयार नाहीत. ते आजही त्यांच्या जुन्या परंपरा, रितीरिवाज फॉलो करतात. राजस्थानच्या जैलसमेरमधील रामदेयो गावात असंच बघायला मिळतं.
भारतात सामान्यपणे एकच लग्न केलं जातं. काही केसेसमध्ये लोक दोन लग्ने करतात. पण या गावात प्रत्येक पुरूष दोन लग्न करतो. सामान्यपणे महिला पतीच्या दुसऱ्या पत्नीला अजिबात स्वीकारत नाहीत. यावरून अनेक वाद, भांडणं होतात. पण या गावात असं काही होत नाही. उलट या गावात पहिली पत्नीच पतीच्या दुसऱ्या पत्नीचं स्वागत करते. त्यानंतर दोघीही बहिणीसारख्या आनंदाने सोबत राहतात.
असं का?
रामदेयो गावात प्रत्येक पुरूष दोन लग्न करतो. यामागे अजब कारण आहे. असं म्हटलं जातं की, जो पुरूष या गावात एक लग्न करतो, त्याची पत्नी कधीच प्रेग्नेंट नाही. जर चुकून त्याची पत्नी प्रेग्नेंट झाली तर मुलीचाच जन्म होतो. अशात येथील लोकांनी मान्यता आहे की, दुसरं लग्न केलं तर सगळ्यांना मुलगा होतो.
बहिणींसारख्या राहतात दोन्ही महिला
जेव्हाही या गावात एखादा पुरूष दुसरं लग्न करतो. तेव्हा त्याची पहिली पत्नी लग्नाची सगळी तयारी करते. पतीच्या दुसऱ्या पत्नीचं ती स्वत: स्वागत करते. इतकंच नाही तर दोघांच्या मधुचंद्राची ती स्वत: तयारी करते. त्यानंतर आयुष्यभर त्या सवती म्हणून नाहीतर बहिणी म्हणून सोबत राहतात. पण आता काळानुसार, गावातील तरूण या रिवाजाला विरोध करू लागले आहेत. अनेकजण म्हणतात की, पुरूषांना आपल्या फायद्यासाठी हा रिवाज सुरू केला. ज्याला या महिलांनी आपलं नशीब समजलं.