(Image Credit : News 18)
गुजरातच्या अमरेलीमध्ये एक गौशाळा आहे. जिथे गायी, म्हशी आणि बैलांची देखरेख केली जाते. या जनावरांची किंमत लाखो रूपये आहे. येथील राघव नंदी बैलाची किंमत तर एका लक्झरी कारपेक्षाही जास्त आहे.
अमरेली जिल्ह्यातील शेतकरी शेतीसोबत पशुपालनही खूप करतात. ज्याद्वारे ते लाखो रूपयांची कमाई करतात. शेतकरी गिर प्रजातीच्या गायी आणि बैलांचीही काळजी घेतात.
News 18 च्या एका वृत्तानुसार, सावरकुंडा तालुक्यातील अमृतवेल गावात खोडियार माताजीच्या मंदिरात एक गौशाळा आहे. इथे एक राघव नावाचा बैल आहे. ज्याची किंमत 45 लाख रूपयांपेक्षाही जास्त आहे. त्याच खाणं-पिणं एखाद्या राजासारखं आहे. गौशाळेकडून त्याची खास काळजी घेतली जाते.
या गौशाळेत लाडली नावाची एक छोटी गायही आहे. जेव्हा ती चार महिन्यांची होती तेव्हा तिला 11 लाख रूपयात मागण्यात आलं होतं. लाडलीच्या आईला भावनगरमधून 8.60 लाख रूपयात खरेदी करण्यात आलं होतं. तर राघव नंदीची किंमत 45 लाख रूपये आहे. त्याच्या माध्यमातून प्रजनन केलं जातं. लाडली गायीची आई रोज 28 लीटर दूध देते.
येथील सगळ्या गायी भरपूर दूध देतात आणि त्यांची वासरही दनकट असतात. त्यामुळेच त्यांची इतकी किंमत लावली जाते.