Cursed chair : 18व्या शतकात इंग्लंडच्या थर्स्कमध्ये थॉमस बज्बी नावाची एक व्यक्ती राहत होती. त्याचा एक साथीदार होता ज्याचं नाव होतं डेनिअल औटी. असं सांगितलं जातं की, हे दोघेही खोटी नाणी बनवण्याचं काम करत होते. डेनिअल हा थॉमसचा केवळ चांगला मित्रच नाही तर त्याची मुलगी एलिजाबेथसोबत थॉमसने लग्न केलं होतं. ज्यानंतर दोघे जावई-सासरे झाले.
कामानंतर रोज ते सोबत thirsk मधील त्यांच्या फेवरेट बारमध्ये बसत होते आणि तिथे दारू पित होते. थॉमस या बारमध्ये नेहमी एकाच खुर्चीवर बसत होता. जी त्याला खूप आवडत होती. जर त्या खुर्चीवर दुसरं कुणी बसलं तर थॉमस भांडण करत होता. पण पुढे जाऊन ही खुर्ची किती लोकांचा जीव घेणार आहे याचा कुणालाच अंदाज नव्हता.
ही कहाणी सुरू होते 1702 मध्ये. एक दिवस बारमध्ये काही कारणावरून थॉमस आणि डेनिअल यांच्यात भांडण होतं. दोघे एकमेकांना मारहाण करतात. मग थॉमसला चिडवण्यासाठी डेनिअल त्याच्या आवडत्या खुर्चीवर बसला. थॉमसा हे बघून इतका राग आला की, त्याने डेनिअलची हत्या केली.
पोलिसांनी हत्येच्या आरोपात थॉमसला अटक केली. ज्यानंतर सासऱ्याच्या हत्येबाबत थॉमसला मृत्यूदंड देण्यात आला. ज्या दिवशी थॉमसला फाशी दिली जाणार होती त्या दिवशी त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली गेली. तेव्हा थॉमस म्हणाला की, त्याला त्याच्या आवडत्या खुर्चीवर बसून जेवण करायचं आहे. थॉमसची ही इच्छा मानली गेली आणि त्याला बारमध्ये नेण्यात आलं. जेवण केल्यावर तो उभा झाला आणि म्हणाला की, 'त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे जो माझ्या खुर्चीवर बसण्याची हिंमत करेल'. तेव्हापासून ही खुर्ची शापित झाली.
Medium.com नुसार, दुसऱ्या महायुद्धा दरम्यान रॉयलचे दोन पायलट त्या बारमध्ये आले आणि त्याच खुर्चीवर बसले. त्यानंतर जेव्हा ते बारमधून बाहेर निघाले तेव्हा त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला. सतत होत असलेल्या मृत्यूंमुळे बार मालकाने ही खुर्ची गोदामात ठेवली. पण इथेही या खुर्चीने लोकांचा पिच्छा सोडला नाही.
एकदा गोदाममध्ये एक मजूर थकल्यानंतर त्या खुर्चीवर बसला. नंतर एक तासांनंतर एका रोड अपघातात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बार मालकाने ही खुर्ची एका म्युझिअमला दान केली. तेव्हापासून 5 फूट उंचीवर ही खुर्ची लटकवण्यात आली आहे. जेणेकरून चुकूनही यावर कुणी बसू नये.