कोरोनामुळे भारतात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. भारतासोबतच इतरही काही देशांमध्ये या महामारीमुळे संघर्ष सुरू आहे. मात्र एक देश असाही आहे जेथील लोकांच्या मनातून कोरोनाती भीती गायब झाली आहे. या देशात नुकताच एक कोरोना काळातील सर्वात मोठा म्युझिक कॉन्सर्ट झाला.
न्यूझीलॅंडमध्ये ५० हजारांहून अधिक लोकांनी एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली. धक्कादायक बाब म्हणजे या लोकांनी ना मास्क लावला होता ना इथे कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टंसिंग पाळलं जात होतं. न्यूझीलॅंडचा बॅंड सिक्स६० ने ऑकलॅंडच्या ईडन पार्कमध्ये एक शानदार परफॉर्मन्स दिलं.
असे मानले जात आहे की, हा कोरोना महामारी काळातील आतापर्यंतचा सर्वात मोठा म्युझिक कॉन्सर्ट आहे. न्यूझीलॅंडने ज्याप्रकारे कोरोना महामारीसोबत लढा दिला त्याचं वेगवेगळ्या स्तरातून कौतुक होत आहे. या देशात कोरोना व्हायरसने केवळ २६ लोकांचे जीव गेले. तर कोरोनाच्या केवळ ६०१ केसेस बघायला मिळाल्या. (हे पण वाचा : एकाच दिवसात २८ लाख लिटर बिअरचा फन्ना!)
न्यूझीलॅंडने इंटरनॅशनल बॉर्डर बंद करणे, आक्रामकपणे कोरोना टेस्टिंग करणे आणि कॉन्टेक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून व्हायरसला हरवण्यात यश मिळवलं. या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये पोहोचलेल्या एक व्यक्तीने सोशल मीडियावर लिहिले की, मी फारच नशीबवान आहे की, मी न्यूझीलॅंडमध्ये राहतो. कारण आम्ही जसं लाइफ जगत आहोत, तशा लाइफबाबत जगातील कोट्यावधी लोक केवळ विचारच करू शकतात. (हे पण वाचा : ना उम्र की सीमा हो...! पतीला घटस्फोट दिल्यावर ३१ वर्षीय महिलेने चक्क सासऱ्यासोबत थाटला संसार)
न्यूझीलॅंडच्या ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार कोरोना व्हायरससोबत डील करणाऱ्या देशांमध्ये टॉपही केलं होतं. बॉर्डर बंद करण्याच्या नादात या देशाच्या टुरिज्मला धक्का बसला होता. मात्र सध्या न्यूझीलॅंडने ऑस्ट्रेलियासोबत क्वारंटाईन फ्री प्रवास सुरू केला. याआधी स्पेनच्या बार्सिलोनामध्ये गेल्या महिन्यात एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त लोक पोहोचले होते. या इव्हेंटला प्रशासनाने सपोर्ट केला होता. सर्व लोकांना कोविड टेस्टनंतर म्युझिक कॉन्सर्टमध्ये जाण्याची संधी मिळाली होती.