मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात केवळ १० रूपयांसाठी तीन मित्रांनी जीव धोक्यात टाकला. पैज होती की, पुराच्या पाण्यातून पुलावरून त्यांना बाइक घेऊन जायची आहे. जीवाची पर्वा न करता तीन मित्र या खतरनाक खेळासाठी तयार झाले. जशी बाइक नाल्यात पोहोचली, तिघांचीही भंबेरी उडाली. बाइक नाल्यात फसली. पाण्याच्या वेगात तिघे मित्रही निट उभे राहू शकत नव्हते. या घटनेची उपस्थित लोकांनी व्हिडीओ काढला.
सतना जिल्ह्यातील उचेहरा पोलीस स्टेशन क्षेत्रातील पिपरियामध्ये तीन मित्रांनी १० रूपयांची पैज लावली होती. १० रूपयांच्या लालसेपोटी मित्रांनी पावसाच्या पाण्याने वाहू लागलेल्या नाल्याला पार करण्याचा निर्णय घेतला. बाइक घेऊन तिघेही मित्र नाल्यात शिरले, पण नाला पार करू शकले नाही.
पैज होती की, नाल्यात असलेल्या रपट्याला पार करायचं आहे. पावसामुळे नाल्याला मोठा पूर आला होता आणि रपट्याच्या दोन फुट वरून पाणी वाहत होतं. अशात नाला पार करणं त्यांच्यासाठी कठीण होतं. पण पैज लागली असल्याने तिघेही मागे वळले नाहीत.
हे तिघेही देवाच्या दर्शनासाठी आले होते. तेव्हाच जोरदार पाऊस सुरू झाला. यादरम्यान मित्रांनी ही जीवघेणी पैज लावली. सांगितलं गेलं की, बाइक जेव्हा अर्ध्यात पोहोचली तेव्हा अचानक बंद पडली. पाण्याचा वेग जोरात होता. त्यामुळे तिघेही घसरू लागले होते. तिघांनाही एकमेकांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. पाहता पाहता बाइक पाण्यात वाहून गेली आणि तिघेही एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. तिघेही कसेतरी नाल्यातून बाहेर आले. पण साधारण ८० हजार रूपयांची बाइक पाण्यात वाहून गेली.