आपल्याला अनेकदा चित्रपटांमध्ये मोठी आणि अगदी मनमोहक अशी परदेशातील हॉटेल्स पाहून आश्चर्यचकीत होतो. परंतु कदाचित तुम्हाला माहित नसेल आपल्या देशातही एकापेक्षा एक अशी लग्झरीअस हॉटेल्स आहेत. तीन तर हॉटेल्स अशी आहे, ज्या ठिकाणी राहण्यासाठी तुम्हाला दिवसाला तब्बल १० लाख रूपये मोजावे लागतील.
या लग्झरीअस हॉटेलमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे टाटा समुहाचं. यांच्या सुइट्सची तर बातच निराळी आहे. यात एका दिवसाचा जो तुम्हाला खर्च येतो त्यात तुम्ही अनेक ठिकाणी फिरूही शकता. परंतु यानंतरही अनेक जण या ठिकाणी राहण्यासाठी उत्सुक असतात.
रामबाग पॅलेस : भारतीय शाही महालांपैकी एक म्हणजे जयपूरचा रामबाग पॅलेस. हा महाल १८८० पर्यंत एका घनदाट जंगलाच्या आत स्थित होता. एक ब्रिटश लष्कर अधिकारी सॅम्युअल स्विंटन जॅकब यांच्या डिझाईन आणि विचारानंतर हा महाल तयाक करण्यात आला. १९३१ मध्ये महाराजा सवाई मान सिंह द्वितीय यांनी या महालाला आपलं प्रमुख निवासस्थान बनवलं. यात त्यांनी अनेक सुइट्स तयार केले. यात असलेले सुख निवास आणि सुर्यवंशी सुइट्स हे सर्वाधिक किंमतीचे आहेत. जयपूरच्या रामबाग पॅलेसमध्ये ताज हॉटेलद्वारे सादर केले जाणारे भव्य आवास आहेत.
ताज लेक पॅलेस - राजस्थानच्या उदयपुरमध्येच ताज लेक पॅलेस आहे. जगनिवास पॅलेसला उदयपूरच्या पूर्वीच लक्झरी हॉटेलमध्ये बदलण्यात आलं होतं. १९७१ पर्यंत मेवाड राजवंशाचे विद्यमान प्रमुख महाराणा महेंद्र सिंग त्या हॉटेलचे प्रभारी होते. परंतु ताजनं अधिग्रहण केल्यानंतर या हॉटेलचं नाव बदलून ताज लेक पॅलेस केलं. यामधील शंभू प्रकाश सुइट या हॉटेलमधील सर्वात महागडी जागा आहे.
काय आहे विशेष ?मुंबईतीलटाटा सुइट्स पाहुण्यांसाठी निराळाच अनुभव ठरत असल्याचं एडिनबर्गचे ड्युक प्रिन्स फिलिप यांनी २०१० मध्ये सांगितलं होतं. लाऊंज रूम, ऑफिस स्पेस, मीटिंग रूम, १२ सीटर डायनिंग रूम, मास्टर बेडरूम, गेस्ट बेडरूम, वॉक इन वॉर्डरोब, खासगी स्पा आणि जिमसोबत ७,५०० स्क्वेअर फुटांचं ही सुइट्स आहे. ताजमहाल पॅलेसमध्ये या टाटा सुइट्सना बनवण्यासाठी १६ खोल्या जोडण्यात आल्या. यामध्ये आकर्षक सजावट, १९ व्या शतकातील सजावट, एमएफ हुसैन आणि अंजली ईला मेमन यांच्या कला आणि १९ व्या शतकातील लिखोग्रामधील टाटा कुटुंबीयांचे दुर्मिळ चित्रेदेखील आहेत.