जगभरातून अशात अनेक घटना समोर येत असतात ज्यात काही लोकांना पाण्याची भिती वाटते तर कधी कुणाला अंधाराची भिती वाटते. पण तुम्ही कुणाला जेवणाची भिती वाटत असल्याचं ऐकलं का? जेवण अशी बाब आहे ज्याशिवाय कुणी जिवंत राहू शकत नाही. पण एका 3 वर्षाच्या मुलासोबत असं होत आहे. साधारण एक वर्षापासून त्याने तोंडावाटे काहीच खाल्लेलं नाही. त्याला जेवण ट्यूबच्या माध्यमातून दिलं जात आहे. इंग्लंडचा राहणारा ओलिवर टेलर 2 वर्षाचा होता तेव्हा त्याला कुपोषण आणि डिहायड्रेशनची समस्या झाली होती.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ओलिवरला एवोइडेंट रेस्ट्रिक्टिव फूड इनटेक डिसॉर्डर (ARFID) आहे. ज्यात व्यक्तीला जेवणाची भिती वाटते किंवा जेवणाच्या टेस्टबाबत नकारात्मक भावना होते. ओलिवरची आई एमाने सांगितलं की, हो, हा एक जेवणाबाबतच डिसॉर्डर आहे. पण 2 वर्षाच्या कमी वयापेक्षाची मुले याने पीडित होतात. ओलिवर जो ऑटिस्टिकही आहे. हे संवेदनशील आहे आणि याने भिती तयार होते. तो जेवणाला घाबरतो. ओलिवरचे आई-वडील एमा आणि मॅटी टेलर यांनी आपल्या मुलाची कहाणी शेअर केली. जेणेकरून लोकांनाही याबाबत कळावं.
त्यांनी सांगितलं की, जेवण आणि तरल पदार्थ ओलिवरला आवडत नाहीत. तो 2023 पासून जास्तीत जास्त मशीनवर अवलंबून आहे. त्याला रात्रभर 10 तास आणि दिवसातून 4 तास यांच्या माध्यमातून अन्न दिलं जातं. तो अजूनही आपलं जेवण ट्यूबच्या माध्यमातून करतो. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये त्याच्या पोटात एक स्थायी ट्यूब लावण्यात आली होती.
एमाने सांगितलं की, ट्यूब फिडिंगच्या माध्यमातून जवळपास 12 महिन्यात त्याच्या शरीराचं एक तृतीयांश वजन वाढलं आहे. पण तुम्ही त्याच्यावर आणि आमच्या परिवारावर होणाऱ्या प्रभावाची कल्पना करू शकत नाही. तो अजूनही जेवणाबाबत त्रासतो.