वॉश्गिंटन – जंगली प्राण्यांमध्ये झालेली लढाई तुम्ही अनेकदा पाहिली असेल. परंतु कधी मगर(Crocodile) आणि भलामोठा एनाकोंडा(Anaconda) यांची लढाई पाहिलीय का? अमेरिकेतील इंडियानामध्ये राहणारी किम सुलिवन (Kim Sulllivan) ही या दुर्मिळ लढाईची साक्षीदार बनली आहे. जवळपास ४० मिनिटं या दोघांमध्ये थरारक युद्ध झालं. ब्राझीलच्या कुइआबा नदीच्या किनारी या दोन्ही योद्धांमध्ये संघर्ष सुरू होता.
Jaguars च्या शोधात होती फोटोग्राफर
द सनच्या रिपोर्टनुसार, फोटोग्राफर किम सुलिवन चित्त्याचा (Jaguars) शोध घेत एका नौकेतून प्रवास करत होती. तेव्हा तिची नजर नदी किनारी एका मगरीवर पडली. जिने भल्यामोठ्या एनाकोंडाने तिला पकडून ठेवलं होतं. किमने यापूर्वी असं दृश्य कधीही पाहिलं नव्हतं. ती जिथं होती तिथेच थांबली. त्यानंतर तिने तिच्या कॅमेऱ्यात या दोघांची दृश्य कैद केली. अखेर या लढाईत कोण बाजी मारतंय? हे जाणून घेण्यासाठी ती उत्सुक होती.
Anaconda मगरीवर पडला भारी
किमने तिचा अनुभव सांगताना म्हणाली की, असं दृश्य जीवनातून एकदाच पाहायला मिळतं. मी यापूर्वी कधीही अशी लढाई पाहिली नाही. मगर आणि एनाकोंडा दोघंही एकमेकांना मात देण्याचा प्रयत्न करत होते. एनाकोंडाने त्याच्या शिकाराला घट्ट पकडून धरले होते. मगरीचं वाचणं कठीण होतं परंतु ती हार मानण्यास तयार नव्हती. जवळपास ४० मिनिटं या दोघांमधील जीवन-मृत्यूचा संघर्ष सुरूच होता. या संघर्षाचा शेवट पाहण्यासाठी मी तिथेच थांबली.
प्रत्येक प्रयत्नावर पकड मजबूत झाली
मगरीने अनेकदा एनाकोंडाला हवेत ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक प्रयत्नानंतर एनाकोंडाची पकड आणखी मजबूत झाली. असं वाटत होतं की, या संघर्षात एनाकोंडा बाजी मारेल परंतु अचानक मगरीनं खोल पाण्यात झेप घेतली. कदाचित जमिनीवर ही लढाई जिंकू शकत नाही असं मगरीला वाटलं असावं. त्यासाठी तिने पाण्यात उडी घेतली. जशी मगर पाण्यात आली तसं एनाकोंडाची पकड ढिली पडली. काही वेळानंतर मगर बाहेर आली तेव्हा ती पूर्णपणे स्वातंत्र्य होती.
मगर बिनधास्त पाण्याबाहेर येताना पाहिल्यानंतर किमला वाटलं की एनाकोंडा मारला गेला असेल पण काही सेकंदात पाण्यात पुन्हा हालचाल झाली. एनाकोंडा वेगाने पोहत त्याठिकाणाहून जात होता. म्हणजे ही लढाई अनिर्णायक ठरली. ना कोणी जिंकलं ना कोणी हारलं. परंतु एनाकोंडाला हे नक्की कळालं असेल पाण्यात राहून मगरीशी वैर केलं जाऊ शकत नाही. मागील सप्टेंबर महिन्यात किम ब्राझीलला गेली होती. तेव्हा हा दुर्मिळ संघर्ष तिने तिच्या कॅमेऱ्यात कैद केले.