शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

दरोडेखोरांनी सारं लुटून नेलं; पण 'ती' मागे हटली नाही; १०० रूपयांमध्ये वाढविला चिप्सचा बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 7:26 PM

Inspirational Story of business women : केरळच्या त्रिशूरची रहिवासी असलेली महिला (Business Woman), इलावरसी जयकांत यांचे आयुष्य २०११ मध्ये पालटलं.

(image Credit- thebetterindia)

अनेकदा चोरी किंवा दरोडा पडल्यानंतर अनेक माणसं उद्धवस्त होतात. फक्त आर्थिक स्थितीने नाही तर मनानेही. कारण  काबाड कष्ट करून जमवलेला पैसा, दागदागिने काही क्षणात कोणीतरी लुटून घेऊन  गेलंय याचा स्वीकार करणं कठीण असतं. पण अशा स्थितीतूनही स्वतःच्या पायावर उभं राहून यशस्वी झालेल्या एका महिलेची कहाणी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

केरळच्या त्रिशूरची रहिवासी असलेली महिला (Business Woman), इलावरसी जयकांत यांचे आयुष्य २०११ मध्ये पालटलं. त्यांच्या सुपरमार्केटमध्ये दरोडा पडला होता. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आतापर्यंत जमवलेले सगळे पैसै, बचत गमवावी लागली.  या घटनेनंतर त्यांच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम झाला. त्यांना महिनाभर रुग्णालयात भरती करावं लागलं होतं. रात्रंदिवस मेहनत करून उभारलेलं सुपरमार्केट एका रात्रीत चोरी झाल्यानं त्यांना मानसिक धक्का बसला होता. 

इलावरसी यांचे कुटुंब ४५ वर्षांपासून केरळच्या  त्रिशूर जिल्ह्यात वास्तव्यास आहे. त्याचे आजी, आजोबा आणि आई- वडील मिठाई, विकून पैसै मिळवायचे. इलावरसी याच वातावरणात मोठ्या झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी घराघरात जाऊन गरजू कुटुंबांची मदतही केली. लग्नानंतर त्यांनी माहेरच्या पंरपरेप्रमाणेच मिठाई आणि  फरसाण बनवणं सुरू केलं. त्यानंतर आजूबाजूच्या घरात आणि दुकानांमध्ये विकायला सुरूवात केली. त्यांनी  सांगितले की, ''आमच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि सुंगंधानं ग्राहकांना आकर्षित केलं आहे. त्यामुळे विक्री दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत होती.''

इलावरसी यांनी सांगितले की, ''मला नेहमीच एक व्यावसाईक बनायचं होतं. मी माझा मुलगा आणि पती यांच्यासह त्रिशूरमध्ये एक सुपरमार्केट  उघडण्याबाबत चर्चा केली. या सुपरमार्केटमध्ये मला वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स आणि चिप्स विकायचे होते. मी माझ्या बचतीतील सगळे पैसै एकत्र केले आणि बँकेकडून कर्ज घेतले. त्यानंतर  २०१० मध्ये एक दुकान उघडलं.''  

त्या वेळी त्यांना खूप आनंद झाला होता कारण  स्वप्न सत्यात उतरताना दिसत होते. त्यांच्या उत्पादनांमध्ये आंबा, केशर, बीट, जॅकफ्रूट, आणि काकडी यासारख्या फळ-भाज्या बनविलेल्या केक व चिप्सदेखील होते. इलावरासी म्हणतात, ''दररोज आमची विक्री आणि ग्राहक वाढू लागले. त्या दिवसांत मी जवळपास 50 लोकांना नोकरी देखील दिली. आम्ही ग्राहकांच्या गरजेनुसार विविध प्रकारची उत्पादने तयार केली.''

त्यांचे जीवन सुरळीत चालू होते, त्या दरोड्यानंतर जणू ग्रहण लागले होते. त्या म्हणाल्या, ''दरोड्याच्या घटनेने मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दु: खी झाले. कित्येक महिने रुग्णालयात राहावे लागले. मला कमी रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. तरीही मी हार मानली नाही. मी माझ्यावर विश्वास ठेवला आणि या विश्वासाने मी पुन्हा एकदा माझा व्यवसाय उभा केला. आज आमच्याकडे चार स्टोअर आहेत जिथे मिठाई, स्नॅक्स, केक्स आणि लोणच्यांसह 60 हून अधिक उत्पादने बनविली जातात. "

पुढे त्या म्हणाल्या की, "दरोड्याच्या घटनेनं  मला कित्येक महिने रूग्णालयात ठेवले आणि कोणतीही औषधे प्रभावी झाली नाहीत. कालांतराने, मला हे समजले की मी नेहमी भीतीने जगू शकत नाही. मी फक्त माझ्या कुटुंबासाठीच नाही तर माझ्या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांसाठी देखील आहे. मी लोकांकडून पैसे घेतले होते, म्हणून मी जर स्वतःला सांभाळले नसते तर त्यांनाही नुकसानाचा सामना करावा लागला असता. बँकेचे कर्ज परत करण्यासाठी अधिकारी दररोज  मागे असायचे. इतर लोकही कुटुंबाला त्रास देऊ लागले. परिस्थिती हाताळण्यासाठी, मी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. या आशेने की जर मी काम करत असेल तर किमान ज्यांना पैसे द्यायचे आहेत ते थोडी प्रतीक्षा करतील.''

२०१२ मध्ये, त्यांनी त्रिशूर रेल्वे स्थानकाजवळ आपला 'अश्वती हॉट चिप्स स्टॉल' उघडला. याबद्दल त्या म्हणतात की, “फराळ बनवण्याचे कौशल्य माझ्याकडे होते आणि म्हणूनच मी माझ्या  व्यवसायाला आणखी एक संधी देण्याचे ठरविले. माझ्यासाठी, नवीन व्यवसायात पुन्हा गुंतवणूक करणे खूप कठीण होते, म्हणून मी माझा नवीन व्यवसाय 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सुरू केला. "

खरंच? रबरासारखं लवचीक आहे १३ वर्षांच्या चिमुरडीचं शरीर; लॅपटॉप चालवणं, होमवर्क सगळं काही करते पायानं

 स्टॉलसाठी रेल्वे स्थानक निवडण्यामागील कारण सांगून त्या म्हणाल्या की, ''ट्रेन प्रवाशांना सहसा खाण्यासाठी हलके व किफायतशीर असे काहीतरी हवे असते. काही दिवसातच त्याच्या गरम चिप्स आणि वडा ट्रेनच्या प्रवाश्यांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले. कालांतराने इतर ठिकाणाहूनही लोक त्याच्या फराळाचा स्वाद घेण्यासाठी त्याच्या स्टॉलवर येऊ लागले. काही दिवसानंतर  स्टॉलवर दिवसभर ग्राहकांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळाल्या.''

वाह मानलं! लठ्ठपणाला कंटाळून जीम जायला लागलं हे जोडपं अन् मग...; फोटो पाहून आजपासूनच जीमला जाल

इलावरासीचे उत्पन्न वाढू लागताच त्यांनी त्याचे कर्ज फेडण्यास सुरूवात केली. त्यांनी स्टॉलवरुन मिळवलेल्या भांडवलाचा वापर करून दुसरे दुकान उघडण्यासाठी त्रिशूरमध्ये गुंतवणूक केली. त्यांच्या स्टोअरमध्ये आता चिप्स, केक्स आणि लोणच्यांसह विविध प्रकारचे स्नॅक्स विकले जातात. त्यांना पुरस्करसुद्धा मिळाला आहे एलावर्सी यांना बिस्गेटने 'इमर्जिंग एंटरप्रेन्योर' पुरस्काराने सन्मानित केले आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेKeralaकेरळInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी