शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

असा समाज, जिथे अनेक भावांची एकच असते पत्नी; टोपीने केली जाते वेळेची वाटणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 3:12 PM

Men share one wife : एक महिलेचे अनेक पती हे तिबेटमध्ये बघायला मिळतं. हा एक छोटा देश आहे. जो बऱ्याच काळापासून चीनच्या मनमानीचा सामना करत आहे. अशात जीवन जगण्यासाठी त्यांच्याकडे फारशी साधने नाहीत.

Men share one wife : राज्यात सध्या जुळ्या मुलींसोबत लग्न करणाऱ्या तरूणाची चांगलीच चर्चा सुरू आहे. हिंदू मॅक्ट मॅरेजनुसार एक पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, जर लग्न करणाऱ्या तरूणींनाच काही हरकत नव्हती, तर गुन्हा दाखल होण्याचं काय कारण? या उलटही होतं. असे काही समाज आहेत, जिथे बहुपती रिवाज आहे. इथे एक पत्नी अनेक पतींसोबत एकाच घरात राहते.

एक महिलेचे अनेक पती हे तिबेटमध्ये बघायला मिळतं. हा एक छोटा देश आहे. जो बऱ्याच काळापासून चीनच्या मनमानीचा सामना करत आहे. अशात जीवन जगण्यासाठी त्यांच्याकडे फारशी साधने नाहीत. इथे जास्तीत जास्त लोक शेतकरी आहेत. जे छोटी शेती करून परिवाराचं पोट भरतात. अशात जर अनेक भाऊ असलेल्या परिवारात सगळ्यांचं लग्न झालं आणि मुलंही झाले तर छोट्या जमिनीचे अनेक हिस्से पडतील. 

एक तर्क असाही होता की, एक पती कामधंद्यासाठी बाहेर गेला तर घरीची देखरेख त्याच जबाबदारीने दुसरा पती करू शकतो. युनिवर्सिटी ऑफ नेब्रास्काने सत्तरच्या दशकापासून ते आताच्याही अनेक मानसशास्त्रांच्या हवाल्याने रिसर्च केले आणि त्यांना आढळलं की, आता फॅमिली लॉ आल्याने बहुपती बेकायदेशीर झालं आहे. पण तिबेटच्या गावांमध्ये अजनूही हे सुरू आहे.

अशात प्रश्न असाही उपस्थित राहतो की, अनेक पती असल्याने त्यांच्यात तणाव राहत नसेल का? ते वेळेची वाटणी कसे करत असतील? याचं उत्तर मेवलिन गोल्डस्टेन यांच्या वेन ब्रदर्स शेअर ए वाइफ या लेखात मिळतं. त्यांनी अनेक वर्ष तिबेटमध्ये घालवली आणि तेथील समाजाला जवळून पाहिलं. त्यांनी लिहिलं की, तिबेटी समाजात सामान्यपणे लग्ने घरातील मोठे लोक ठरवतात. त्यामागचं कारण हे असतं की, त्यांच्यात जमिनीवरून वाद होऊ नये. यावर उपाय म्हणून ते बहुपती या प्रथेकडे बघतात. 

यांच्यात लग्नेही वेगळ्या पद्धतीने होतात. मधे मोठा भाई आणि होणारी नवरी बसलेली असते. त्यांच्या आजूबाजूला इतर लहान भाऊ बसलेले असतात. लग्नाचे सगळे रिवाज मोठ्या भावासोबत होतात. इतर भाऊ एकप्रकारे साक्षीदार म्हणून असतात. पण घरात नवरी आली की, ती सगळ्यांची पत्नी असते. अशात हेही ठरतं की, जर भावांपैकी कुणा एकाचा मृत्यू झाला तरी पत्नी एकटी राहणार नाही.

एकापेक्षा जास्त पती असले की, बरेच नाजूक प्रश्न सुद्धा उपस्थित होतात. जसे की, वेळेची विभागणी कशी होते किंवा मुलाबाबत कसं ठरतं की, तो कोणत्या वडिलांचा आहे? याबाबतही या लोकांनी काही उपाय शोधून काढले आहेत. ज्यात एक टोपी महत्वाची भूमिका बजावते. जेव्हा महिला एखाद्या पुरूषासोबत असते, तेव्हा रूमच्या बाहेर एक टोपी ठेवली जाते. जेणेकरून त्यांना समजावं. जर कुणी आत असेल तर इतर कुणीही आत जात नाही. त्यासोबतच या लग्नातून जन्माला आलेलं बाळ हे सगळे त्यांचं बाळ मानतात आणि त्यात कोणताही भेदभाव करत नाहीत. मुलाच्या खऱ्या वडिलाबाबत ना कुणी विचारत ना काही.  

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेmarriageलग्न