(Image Credit : DailyMail)
अनेक लोक दात खराब झाले की, कुणी चांदीचे तर कुणी सोन्याचे दात बसवून घेतात. पण कधी तुम्ही एखाद्या प्राण्याला सोन्याचा दात बसवलेलं ऐकलं किंवा पाहिलं नसेल. मात्र, अशी एक घटना समोर आली आहे. इटलीच्या तस्करांच्या जाळ्यातून सोडवण्यात आलेल्या कारा वाघिणीला सोन्याचा दात लावण्यात आलाय.
ऑगस्ट महिन्यात एक खेळणं चावताना काराचा दात तुटला होता. डेनमार्कच्या तज्ज्ञांनी जर्मनीच्या मॅसवायर शहरात काराचं ऑपरेशन केलं. सर्जरीच्या तीन आठवड्यानंतर कारा सामान्य झाली.
डेंटिस्टच्या एका टिमने काराच्या दाताची सर्जरी दोन टप्प्यात पूर्ण केली. ऑगस्ट महिन्यात तुटलेल्या दातावर उपचार करण्यात आले. यासाठी दोन तास लागले. नंतर सोन्याचा दात ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला लावण्यात आला. या ऑपरेशनला ४ तास इतका वेळ लागला.
तीन आठवडे सोन्याचा दाताला चाटत होती
तज्ज्ञांनुसार, तीन आठवड्यांपर्यंत साराला हाडे नसलेलं मास खायला देण्यात आलं. दात लावल्यानंतर कारा अनेक दिवस तो दात चाटत होती. कारण धातूच्या नव्या दातामुळे तिला जरा वेगळं वाटत होतं.
नवा दात पूर्णपणे सेट
तज्ज्ञ ईवा लिंडेनस्मिड्ट म्हणाल्या की, 'आम्ही फार आनंदी आहोत. आता कारा योग्यप्रकारे मास खाऊ शकेल. कारा तिच्या सोन्याच्या दातामुळे नेहमी हसत असल्यासारखी दिसते. आम्ही एक्स-रे पाहिला त्यात दात योग्यप्रकारे सेट झाल्याचं दिसलं'.