शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

'सकाळीच चीनहून आलोय...' असं मुलगा म्हणाला अन् संपूर्ण दिल्ली मेट्रो झाली रिकामी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 4:40 PM

coronavirus : चीन, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे.

ठळक मुद्देजगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टिकटॉक व्हिडीओव्हिडीओला 98 हजारहून अधिक लाइक्स आणि जवळपास 300 कमेंट्स

टिकटॉक (TikTok)वर रोज नव-नवीन व्हिडीओ अपलोड होताना दिसतात. जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर टिकटॉक व्हिडीओ तयार होत आहेत, ते जास्त व्हायरल होत आहेत. 

असाच एक व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रोमध्ये (Delhi Metro) सीट मिळविण्यासाठी एका मुलाने अशी शक्कल लढविली की, संपूर्ण मेट्रोच रिकामी झाली. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहिले तर लक्षात येईल की एक मुलगा फोन वर बोलत आहे. तो म्हणतो, "सकाळीच चीनहून आलोय...". त्यानंतर लगेच त्या मुलाच्या आजू-बाजूला पाहिले तर मेट्रोतील संपूर्ण सीट रिकाम्या झाल्या होत्या. 

@kapilkashyap628

what an idea sir g#@realfunnyvideos @tiktok ##trending##video #@1.million @theforyoupageoffical @tiktok_india

♬ original sound  - VIKAS SHARMA

हा व्हिडीओ टिकटॉक क्रिएटर कपिल कश्यप याने शेअर केला असून 3.8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 98 हजारहून अधिक लाइक्स आणि जवळपास 300 कमेंट्स या व्हिडीओला मिळाल्या आहेत. दरम्यान, चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. 

भारतात 25 जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरसबाबत माहिती दिली. आतापर्यंत फक्त 12 देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात होती. मात्र, यापुढे जगभरातील देशांमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची प्रवाशांची तपासणी केली जाईल, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. 

याचबरोबर, चीन, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

(Coronavirus: मोबाईल वापरता? मग कोरोनापासून जरा जास्तच सावध राहा; कारण...)

(Coronavirus:भारतात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी होणार, विमानतळावरच कॅम्प)

(कोरोनाच्या काळजीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा!)

टॅग्स :corona virusकोरोनाTik Tok Appटिक-टॉक