जगभरात अशा विचित्र किंवा रहस्यमय गोष्टी आहेत ज्यांबाबत वाचल्यावर एकतर त्यावर विश्वास बसायला अवघड जातं नाही तर माणूस हैराण होतो. आज आम्ही तुम्हाला जगातील एका वेगळ्याच गावाबाबत सांगणार आहोत. हे जगातलं असं रहस्यमय गाव आहे जिथे राहणारे लोकंच काय तर प्राणीही अंध आहेत.
जगातलं एकमेव अंधांचं गाव
मेक्सिकोमधील टिल्टेपक गावाला Village Of Blind People म्हटलं जातं. म्हणजे अंध लोकांचं गाव. या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत येथील प्राणीही अंध आहेत. यामागे काहीतरी मोठं रहस्य असल्याचं लोक मानतात. त्यामुळे प्रत्येकाला या गावाबाबत जास्तीत जास्त माहिती मिळवायची असते.
जन्माला येताच काही दिवसात होतात अंध
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गावात जेपोटेक जमातीचे लोक राहतात. एक रहस्य असही आहे की, टिल्टेपक गावात जेव्हा बाळ जन्म घेतं तेव्हा ते बाळ पूर्णपणे ठीक असतं. पण जन्माच्या काही दिवसांनंतर त्याच्या डोळ्याची दृष्टी जाते. नंतर ते बाळंही इतरांसारखं अंध होतं.
झाडाला मानतात कारण
गावात राहणारे लोक यासाठी एका झाडाला जबाबदार मानतात. गावातील लोकांचं मत आहे की, लावजुएला नावाच्या एका झाडाला पाहिल्यावर मनुष्यांसोबतच पशु-पक्षी सगळेच अंध होतात. मात्र, वैज्ञानिकांना हे मान्य नाही. वैज्ञानिकांचं मत आहे की लोकांच्या अंध होण्यामागे झाड नाही तर एक खतरनाक आणि विषारी माशी याचं कारण आहे.
वैज्ञानिक सांगतात की, एका खासप्रकारची विषारी माशी चावल्यानंतर लोकांच्या डोळ्यांच्या दृष्टी जाते. गावातील सगळेच लोक झोपड्यांमध्ये राहतात. या गावात साधारण ७० झोपड्या आहेत. यात साधारण ३०० लोक राहतात. हे सगळेच अंध आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या लोकांच्या झोपड्यांना खिडक्याही नाहीत. असंही मानलं जातं की येथील काही लोकांच्या डोळ्यांची दृष्टी परत आली. त्यामुळे त्यांच्या मदतीने इतर लोकांना जगण्यात मदत होते.