नोकरी करत असल्याने लोकांची झोप उडालेली असते, हळूहळू मित्र कमी होऊ लागतात, पर्सनल लाइफही अस्ताव्यस्त झालेली असते, परिवारातील लोकांनाही वेळ देता येत नाही. एकूणच काय तर काही पैशांच्या बदल्यात आपल्याला कितीतरी गोष्टींपासून दूर जावं लागतं. पण करणार काय ना? काही पर्याय नसतो. मग ऑफिसमध्ये असणारे कित्येकजण टॉयलेटमध्ये वेळ घालवताना बघायला मिळतात. हेच बंद करण्यासाठी एकाने काहीच्या काही आयडिया लावलीये.
एका व्यक्तीला वाटलं की, लोक ऑफिसमधील बाथरूममध्ये फार जास्त वेल घालवतात. त्यामुळे त्याने कमोडला पुढच्या बाजूने वाकलेलं तयार केलं. ज्यावर जास्त वेळ कुणी बसेल तर पाय दुखायला सुरूवात होईल.
(Image Credit : dailymail.co.uk)
ही आयडिया स्टार्ट-अप Biitish Toilet Association(BTA) च्या हाती लागली. त्यांची योजना आहे की, कमोडला पुढच्या बाजूने १३ डिग्री वाकवायचे. मग यावर बसण्यासाठी पायांच्या ताकदीचा वापर करावा लागेल आणि ५ ते ७ मिनिटांपर्यंत बसल्यानंतर आपल्या पायावर उभं राहणं तुम्हाला भाग पडेल.
(Image Credit : cbsnews.com)
ही स्टार्टअप कंपन्यांना आपली ही आयडिया विकण्याची स्ट्रॅटेजी तयार करत आहे. ते म्हणाले की, याने कर्मचारी जास्त काम करू शकतील. इतकंच नाही तर त्यांनी असा दावा केला की, हा कमोड बघायला आरामदायी भलेही दिसत नसेल, पण आरोग्यासाठी याचे फायदेही होऊ शकतात.