तुम्ही लोकांना सिगारेटचं, दारूचं किंवा तंबाखू खाण्याचं व्यसन असल्याचं ऐकलं असेलच. पण तुम्ही कधी विचार केला का की, कुणाला टॉयलेट पेपर खाण्याची सवय असेल? नक्कीच केला नसेल. कारण टॉयलेट पेपर काही खाण्याची गोष्ट नाही. पण एका महिलेला ही सवय आहे.
अमेरिकेत एक महिला एका वर्षात लाखो टॉयलेट पेपर खाते. इतकंच नाही तर ही महिला रोज टॉयलेट पेपर खाते. असं करण्यात तिला मजाही येते. तिने सांगितलं की, जर तिने टॉयलेट पेपर खाल्ला नाही तर तिचा दिवस चांगला जात नाही. या महिलेचं नाव सकीना आहे आणि ती रोज टॉयलेट पेपरचे 4 रोल खाते.
मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, या महिलेसाठी टॉयलेट पेपर खाणं अगदी पीनट बटर आणि जेली सॅंडविच खाण्यासारखं आहे. ती सांगते की, टॉयलेट पेपरच्या टेस्टने तिच्या तोंडाला पाणी सुटतं.
असं सांगण्यात आलं की, या महिलेला एक अजब आजार आहे. ज्याला पिका असं म्हणतात. ही एक अशी स्थिती असते ज्यात रूग्ण अशा वस्तू खातात. रूग्ण माती, साबण इत्यादी गोष्टी खातात.
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, टॉयलेट पेपर खाणं अजिबात सुरक्षित नाही. हे खाण्यासाठी नाहीत आणि याच्या सेवनाने गंभीर समस्या होऊ शकतात.