एखाद्या किड्याचा शरीराशी संपर्क आला तर तो नेहमीच नुकसान पोहोचवण्याचं काम करतो. परंतू लिंग बदलत असलेल्या किड्याबाबत तुम्ही यापूर्वी कधीही ऐकलं नसेल. सोशल मीडिया सध्या अशा परजीवी किड्याचा फोटो व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डॉन मार्क्स नावाच्या तरूणाला हा किडा एका माश्याच्या तोंडात दिसून आले. या तरूणाला माश्यांच्या तोडांतील पिसवं पाहायचे होते. पण त्याचवेळी हा अद्भूत फोटो मार्क्स आपल्या कॅमेरात टिपला आहे.
जेव्हा मार्क्सनं हा फोटो त्याच्या प्रशिक्षकांना पाठवला त्यावेळी तेही चांगलेच हैराण झाले. ज्या माश्याच्या तोंडात हा किडा होता. तो मासा कार्पेंटर जातीचा असून त्याचे दात प्रचंड जीवघेणे असतात. गेल्या अनेक वर्षांपासून या किड्यावर संशोधनास सुरूवात झाली आहे. पण अद्याप जीभ खात असलेल्या या किड्याबाबत फारसे संशोधन झालेले नाही. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं
हा घातक किडा माश्यांना चिकटतो. माश्यांच्या शरीरात परजीवी नसतील तर जिभेला चिटकतो. त्यानंतर रक्त प्यायला सुरूवात होते. रक्त प्यायल्यानंतर किड्याचा आकार वाढून ते मोठे दिसू लागलात. यामुळेच जीभ हळूहळू बारीक होऊ लागते आणि किडा जीभेची जागा घेतो. साधारणपणे मासा जीवंत असेपर्यंत हा किडासुद्धा जिवंत असतो. त्याचवेळी माश्याचे रक्त पिऊन हा किडा अंडी घालतो आणि नवीन अंडी खवल्यांद्वारे बाहेर पडतात. या परजीवींमुळे माशांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत जाते. सलाम! स्वत:ला गंभीर आजार असताना दुसऱ्यांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवणारा 'देवदूत'