जगभरात कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी लोकांनी रुग्णालयांसाठी निधी जमा करण्यास सुरवात केली आहे. यासाठी काही ठिकाणी लोक त्यांच्या छतावर मॅरेथॉन दौड करत आहेत, तर काहीजण घरीत सायकल चालवत आहेत, तर कोणी ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे पैशांची व्यवस्था करत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी देशाची सेवा करण्यास वयाची अट नसते हे दाखवून देत लंडनमधील ९९ वर्षांच्या कॅप्टन टॉम मुरे यांनी येथील ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ हे ब्रिटन सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्रासाठी टॉम मुरे यांनी १००० पौंडापेक्षाही अधिक निधी जमा करून दिला होता. अशाचप्रकारे आता ५ वर्षांच्या दिव्यांग मुलाने १० किलोमीटर चालून रुग्णालयासाठी ९ कोटींपेक्षा जास्त पैसे जमा केले आहेत.
टोनी हडगेल असे या मुलाचे नाव आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, इंग्लंडमधील केंट येथील मूळ रहिवासी टोनीला लहानपणापासूनच पायाची समस्या आहे. असे असूनही, त्याने १० किमीच्या वॉकमध्ये सहभाग घेतला. तो व्यवस्थित चालू शकत नव्हता, तरीही त्याने सहभाग घेतला आणि टास्कचे काम पूर्ण केले. निधीतून त्याने दहा लाख पौंड जमा केले. भारतीय चलनानुसार, हा निधी ९ कोटींपेक्षा जास्त आहे.
टोनी हडगेलची आई पॉला हडगेल यांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात टोनीच्या शरिराला काही नवीन अवयव बसविण्यात आले आहेत. त्यानंतर त्याने चालण्यास सुरवात केली. विशेष म्हणजे पॉला यांनी टोनीला दत्तक घेतले आहे. अल्विना लंडन चिल्ड्रन हॉस्पिटलमधून चार महिन्यांच्या टोनीला दत्तक घेतले होते, असे पॉला यांनी सांगितले.
२०१६ मध्ये तिने आणि तिच्या पतीने टोनीला दत्तक घेतले होते. त्यावेळी त्याची अत्यंत वाईट परिस्थिती होती. त्याच्या शरिराचे काही अवयव काम करत नव्हते. त्याचे वजन खूपच कमी होते. त्यानंतर त्याला घरी आणले, असे पॉला यांनी सांगितले. याचबरोबर, 'टोनी खूप धाडसी मुलगा आहे. त्याच्यावर बरीच ऑपरेशन्स केली आहेत. परंतु त्याने धैर्य सोडले नाही. त्याला खूप आत्मविश्वास आहे आणि तो एक जगासाठी प्रेरणादायी आहे,' असे सल्लागार मिशेल कोकिनाकिस यांनी सांगितले.
दरम्यान, टॉम मुरे हे ब्रिटन सैन्यातील निवृत्त अधिकारी. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी भारत, बर्मा आणि सुमात्रा याठिकाणी त्यांनी आपले कर्तव्य बजावले होते, पण देशासाठी सज्ज असण्याचे हेच कर्तव्य निवृत्त होऊनही ते विसरू शकले नाहीत. म्हणूनच कोरोनाच्या संसर्गात आघाडीवर लढणाऱ्या ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ या आरोग्य केंद्रासाठी आपण निधी उभारावा असे त्यांना मनापासून वाटले. लोकांनी हा निधी उभारण्यास पुढे येण्यासाठी ९९ वर्षीय मुरे यांनी स्वत:लाच आव्हान दिले. बेडफोर्डशायर येथील आपल्या घराच्या आवारातील २५ मीटर बागेला १०० फेऱ्या घालण्याचे आव्हान त्यांनी स्वत:समोर ठेवले आणि ते त्यांनी पूर्ण केले.
आणखी बातम्या...
Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता
"हुकुमशाही कोणाची होती, हे भाजपाच्या नेत्यांना खासगीत विचारा, ते सांगतील"
21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार? केवळ दहा हजार भाविकांना परवानगी
चीनला पुन्हा झटका, भारतानंतर आता 'हा' देश टिकटॉवर बंदी घालण्याच्या तयारीत